प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी ‘तृणमूल’मध्ये जाणार?


विशेष प्रतिनिधी

कोलकता : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला पश्चिम बंगालमध्ये उधाण आले आहे. Abhjeet Mukharjee will join TMC?

पश्चिलम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील बाजी हरल्यानंतर कालच मुकुल रॉय यांनी भाजपला रामराम करीत तृणमुलमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीपूर्वी ‘तृणमूल’मधून भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यां ची रांग लागल्याचे चित्र होते. त्यात मुकुल रॉय अग्रणी होते. बॅनर्जी यांच्या सर्वांत जवळचे समजल्या जाणाऱ्या रॉय यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. रॉय हे त्यांचा मुलगा सुभ्रांशुसह काल ‘तृणमूल’चे सदस्यत्व स्वीकारले. त्या पार्श्वभूमीवर आता अभिजित मुखर्जी यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.



काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितीन प्रसाद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याप्रमाणे अभिजित मुखर्जी हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दिले होते. मुखर्जी हे माजी खासदार असून काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसमधील माझे काही जे आता तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत, ते माझ्याबरोबर चहापानासाठी आले होते. त्यावरुन मी ‘तृणमूल’मध्ये जाणार असल्याची अफवा पसरली असावी, अशी शक्यता मुखर्जी यांनी वर्तविली.

Abhjeet Mukharjee will join TMC?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात