प्रणवदांच्या आत्मचरित्राची दुसरी बाजू; यशवंतराव चव्हाण, सी. सुब्रह्मण्यम यांना बाजूला करण्यासाठी इंदिराजींनी प्रणव मुखर्जींचे अधिकार वाढविले


विनायक ढेरे

नाशिक : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आत्मचरित्र सध्या गाजते आहे. प्रणवदांनी काँग्रेसमधील नेत्यांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेमके काय आणि कसे भाष्य केले आहे, याचे आपापल्या नॅरेटिव्हनुसार सोशल मीडियावर विश्लेषण, राजकीय टीका टिपण्या करण्यात येताहेत… pranav mukherjees autobiography has different aspect too, come out from another book banglore te raibarelli, by v. s. walimbe

याच पार्श्वभूमीवर एका जुन्या पुस्तकातून प्रणवदांच्या राजकारणाची दुसरी बाजू समोर आली आहे… “बंगलोर ते रायबरेली” या वि. स. वाळिंबे यांच्या पुस्तकातून… इंदिराजींच्या राजकारणाचा पट उलगडून दाखविणारा हा अस्सल दस्ताऐवज आहे. वि. स. वाळिंबे प्रख्यात लेखक, संपादक. त्यावेळी केसरीचे सहसंपादक होते… दिल्लीत त्यांचा थेट संपर्क होता. जयंतराव टिळक केसरीचे संपादक आणि राज्यसभेचे सदस्य होते… त्यांच्या माहिती – विश्लेषणावर आधारित हे पुस्तक आहे.इंदिराजींनी आपल्याला खूप तरूण वयात मोठी जबाबदारीची कामे विश्वासाने सोपविली, असे प्रणवदांनी लिहिले आहे… ते खरेच आहे… पण त्याची दुसरी बाजू ही आहे, की १९६९ च्या काँग्रेसमधील सिंडिकेट – इंडिकेट फुटीनंतर इंदिराजींनी पक्षातल्या सर्व बुजूर्ग नेत्यांना दूर करण्यासाठी प्रणवकुमार मुखर्जी यांच्या सारख्या त्यावेळच्या तरूण नेत्यांना जवळ केले होते. त्यात प्रणवकुमार मुखर्जी एकटेच नव्हते, चंद्रजित यादव, देविप्रसाद चट्टोपाध्याय, एचकेएल भगत, विद्याचरण शुक्ल, बन्सीलाल हे नेते इंदिराजींनी अधिकार वाढवून जवळ केले होते. त्यावेळच्या रिपोर्टिंगमध्ये प्रणवदांचा उल्लेख सर्वत्र प्रणवकुमार मुखर्जी असा होत असे… हे देखील वाळिंबे यांच्या पुस्तकातून लक्षात येते.

य़शवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचे प्रणवदांनी लिहिले आहे. तेही खरे आहे… पण प्रणवदा १९७२ साली ज्यावेळी व्यापार खात्यात उपमंत्री झाले… त्यावेळी अर्थखात्यातून तो विभाग बाजूला काढण्यात आला होता. तसेच काहीच महिन्यांनी अर्थखात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सी. सुब्रह्मण्यम यांना देण्यात आली होती, असा तपशील बंगलोर ते रायबरेलीतून मिळतो.

या बाबत वाळिंबे यांचे लिखाण असे – संजय गांधी यांची शिफारस असलेल्या व्यक्तींना कर्जे दिली पाहिजेत, असे आदेश रिझर्व्ह बँकेला जाऊ लागले. शासनाबाहेरील व्यक्तीचा सरकारच्या आर्थिक व्यवहारातील हा हस्तक्षेप सुब्रह्मण्यम यांना नापसंत होता. म्हणून अर्थखात्यातील बँकिंग आणि महसूल हे विभाग सुब्रह्मण्यम यांच्याकडून काढून घेण्यात आले आणि प्रणवकुमार मुखर्जी यांच्याकडे ते सोपविण्यात आले. सुब्रह्मण्यम यांचे अर्थमंत्रिपद नामधारी झाले. कर्ज आणि कर या विषयीचे सारे निर्णय प्रणवकुमार मुखर्जी करू लागले.

बन्सीलाल, ओम मेहता प्रणवकुमार मुखर्जी, चंद्रजित यादव, देविप्रसाद चट्टोपाध्याय, एचकेएल भगत, विद्याचरण शुक्ल आणि रघुरामय्या या केंद्रीय मंत्र्यांमार्फत संजय गांधी सर्व सरकारी विभागांवर नियंत्रण ठेवीत होते. संजय गांधी यांचे हुकूम आपण पाळले तर इंदिराजींची आपल्यावर कृपादृष्टी राहते हे सगळ्यांना कळून आले होते. त्यामुळे संजय गांधी यांच्याभोवती या मंत्र्यांचा वावर होऊ लागला, असे वाळिंबे यांनी “बंगलोर ते रायबरेली”मध्ये स्पष्ट लिहिले आहे.

pranav mukherjees autobiography has different aspect too, come out from another book banglore te raibarelli, by v. s. walimbe

इंदिराजी आपल्या राजकीय गुरू होत्या. फार तरूण वयात विश्वासाने आपल्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या. कामात शिस्त लावून ती आपल्याकडून करवून घेतली, असे लिहिले आहे. ते खरेच आहे. प्रणवदांना वयाच्या पस्तीशी – चाळीशीत केंद्रीय मंत्री म्हणून इंदिराजींनी कामाची संधी दिली. वयाच्या ४५ वर्षी त्यांना केंद्रीय अर्थमंत्री करून कॅबिनेटमधले क्रमांक दोनचे पद दिले. हे खरेच आहे… पण त्यालाही राजकारणाची, ज्येष्ठांना डावलण्याची दुसरी बाजू होती… वाळिंबेंच्या पुस्तकातून ती पुढे आली इतकेच…!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती