राजस्थानात सचिन पायलट पुन्हा नाराज, कॉंग्रेसमध्ये खळबळ, मनधरणी सुरु


विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थानात आता पुन्हा कॉंग्रेसमध्ये बंडाची कुणकुण सुरु झाली आहे. गेल्या वर्षी सचिन पायलट यांच्या मदतीने सत्ता स्थापण्याच्या भाजपचे प्रयत्न विफल झाले होते. मात्र आता पुन्हा पायलट कॉंग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जावू लागले आहे. दरम्यान पायलट यांनी रिटा बहुगुणा जोशी यांच्याशी भाजपप्रवेशाबाबत चर्चा झाल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. Once again Sachin Pilot is unhappy in congress


सचिन पायलट यांची कॉंग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर…. भाजपा नेत्याने दिले निमंत्रण


पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांच्याशी तातडीने दूरध्वनीवरून संवाद साधला. यानंतर पायलट आज दिल्ली रवानाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे युवा नेते जितीनप्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या चर्चचा पुन्हा उत आला आहे. मागील वर्षी पक्षाने दिलेली आश्वाधसने दहा महिन्यानंतर देखील पूर्ण केली नसल्याचे सांगत पायलट यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दुसरीकडे पायलट समर्थक आमदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे बोलले जाते. आता केवळ पाचच आमदार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आला आहे. एकूणच उत्तरेतील या राज्यात सत्तेच्या दरबारात पुन्हा हालचाली होण्याची शक्यता वाढली आहे हे मात्र नक्की.

Once again Sachin Pilot is unhappy in congress

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात