थंड पेयांसह अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. साखर तयार करताना रसायनांचा वापर केला जातो. त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी साखरेला पर्याय ठरू शकणारी अमाई प्रथिने तयार करण्याचा प्रयत्नही कंपनीकडून केला जात आहे. Amai protins will replace sugar in next year
प्रमाणाहून अधिक साखरेच्या सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जगभरातील सुमारे 40 टक्के लोक हे लठ्ठ आहेत आणि त्याचे प्रमुख कारण साखरेचे अति सेवन आहे. फ्लाइंग स्पार्कमध्ये संगणकाच्या साह्याने प्रथिनांची रचना, जैवतंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान या तिन्हींच्या एकत्रीकरणातून साखरेला पर्याय तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विषुववृत्तीय भागातील जंगलांत आढळणाऱ्या फळांमधील गोड प्रथिनांचा अभ्यास करून प्रयोगशाळेत तशा प्रकारची प्रथिने आणि साखर तयार करण्यात येत आहे. प्रयोगशाळेत अमाई प्रथिने तयार करण्यात येत आहेत. पाश्च रायझेशनसारख्या प्रक्रियेत टिकून राहण्यासाठी आणि पदार्थांचे आयुष्य वाढविण्यासाठी अमाई प्रथिनांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. या प्रथिनांमध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यल्प किंवा शून्य असेल.
साखरेमुळे आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि इतर अवयवांवर परिणाम होतो. तसा परिणाम अमाई प्रथिनांमुळे होणार नसल्याचा दावा संशोधकांचा आहे. अमाई प्रथिनांच्या डीएनएची रचना संशोधकांनी आधी संगणकावर तयार केली. त्यानुसार प्रत्यक्ष प्रथिने तयार केली. यासाठी कवकाचा उपयोग केला गेला. योगर्ट, व्हीप्ड क्रीम, सॉस, बिअर, प्रोटिन शेक आणि थंड पेये तयार करण्यासाठी याचे प्रयोग सुरू आहेत. यासाठी विविध कंपन्यांशी करारही करण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more