दोन मंत्रिमंडळ विस्तार; पंजाबात बंडखोरीचा सुळसुळाट; उत्तर प्रदेशात बिनबोभाट…!!


पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलून देखील काँग्रेस मधली बंडखोरी थांबायला तयार नाही. उलट नवीन मंत्र्यांच्या समावेश यावरून काँग्रेस आमदारांनी आपल्या नेत्यांचे पूर्वीचे घोटाळे बाहेर काढले आहेत.Two cabinet extensions; Rebellion in Punjab; Binbobhat in Uttar Pradesh … !!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या दोन राज्यांमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करत आहेत, तर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देत आहेत.

परंतु दोन राज्यांमधल्या राजकीय फरक यानिमित्ताने जनतेसमोर येतो आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलून देखील काँग्रेस मधली बंडखोरी थांबायला तयार नाही. उलट नवीन मंत्र्यांच्या समावेश यावरून काँग्रेस आमदारांनी आपल्या नेत्यांचे पूर्वीचे घोटाळे बाहेर काढले आहेत. राणा गुरुजित सिंग हे २००० कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यात अडकले आहेत.



त्यांना मंत्री करू नये. त्याच्या ऐवजी एक चांगला दलित चेहरा मंत्रिमंडळात घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या सात आमदारांनी केली आहे. यात पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष यांचाही समावेश आहे. या मागणीतली एक मेख अशी की सात बंडखोर आमदारांनी संबंधित पत्र प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना पाठविले आहे. आणि त्याची सीसी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना पाठवली आहे. यातून आपण मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचा अधिक्षेप करत आहोत याची जाणीवही काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना नाही.

एकीकडे पंजाबमध्ये हे चित्र दिसत असताना उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ हे सात नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता आहे. ही सात नावे अजून बाहेर आलेली नाहीत. राजभवनाच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी बाहेर आली आहे.

याचा अर्थ योगी आदित्यनाथ हे बिनबोभाटपणे आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत आहेत. तर पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन चार दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना बंडखोरीचाही “विस्तार” झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Two cabinet extensions; Rebellion in Punjab; Binbobhat in Uttar Pradesh … !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात