‘टिकटॉक’चे सीइओ झांग यिमिंग यांचा राजीनामा, अमेरेकिच्या दबावामुळे निर्णयाची चर्चा


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : जगभरात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकची पालक कंपनी बाइटडान्सचे सह संस्थापक आणि सीइओ झांग यिमिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टिकटॉक कंपनीचे हक्क अमेरिकी कंपनीला विकण्यासाठी बायडेन प्रशासनाकडून येणारा दबाव आणि अनिश्चि्त वातावरणाच्या स्थितीत झांग यांनी सीइओपद सोपडले आहे. Tick Tok CEO resigns

जगभरात काही ठिकाणी चिनी ॲप्सवर बंदी घातल्याने चीनला प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. भारताने बंदी घातल्यानंतर टिकटॉकची पालक कंपनी बाइटडान्सला सुमारे ६०० कोटी डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे.



चीनमध्ये सरकारकडून टेक्नॉलॉजी सेक्टरला कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्याचवेळी दंडही आकारले जात आहेत. दंड लावण्यात आलेल्या कंपनीत बाइटडान्स कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीवर मोनोपॉलीचा आरोप आहे.

झांग यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहले असून त्यात म्हटले की, अजून काही अशा गोष्टी आहेत की त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. माझ्या मते, या क्षेत्रात अन्य व्यक्ती चांगल्या रीतीने काम करू शकेल. वास्तविक माझ्या अंगी चांगला व्यवस्थापक होण्याच्या कौशल्याचा अभाव आहे आणि लोकांना हाताळण्यापेक्षा मला संस्थात्मक रचना आणि बाजारातील मूल्यांचे विश्लेनषण करण्यास अधिक रस आहे. मी फार मोकळा राहत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात बाइटडान्सने म्हटले की, पुढील सहा महिन्यांपर्यंत झांग आणि नवे सीईओ लियॉंग हे एकत्र काम करतील. जेणेकरून जबाबदारीचे हस्तांतर सुलभ होईल.

Tick Tok CEO resigns

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात