इस्रायलविरोधी छाती काढणारे मुस्लिम देश नमतात उगार मुस्लिमवंश दाबणाऱ्या चीनपुढे


पश्चिम आखातामधील इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात पॅलेस्टिनी मुस्लिमांसाठी दुःख व्यक्त करणाऱ्यांची संख्या गेल्या चार दिवसात भारतात अचानक वाढली आहे. मात्र शेजारच्या चीनमधील झिनजियांग प्रांतातील उगार वंशीय मुस्लिमांचे उच्चाटन करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून तेथील कम्युनिस्ट सत्ताधिशांनी चालवले आहेत. या उगार मुस्लिमांवरील अत्याचारांवरुन चीनविरोधात ब्र काढताना कोणी दिसत नाही. ही स्थिती केवळ भारतात नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेशसह अन्य मुस्लिम देशांमध्येही येते. चीनपुढे मिठाची गुळणी धरुन बसणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांची स्वधर्मीयांबद्दलची आस्था एवढी ‘निवडक’ आणि ‘दुबळी’ का असाच प्रश्न यातून निर्माण झाला आहे. Anti-Israel sentiments of Muslim countries silenced in front of China, which oppresses Uyghur Muslims strategically


वृत्तसंस्था

कियारा : चीनच्या सुदूर पश्चिमेस झिनजियांगमधील कियारा शहरातील जीआमान मशीद उंच भिंती आणि कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचार चिन्हांमागे दबून गेली आहे. हीच स्थिती या प्रांतातल्या बहुतेक मशिदींची झाली आहे. चिनी कम्युनिस्ट राजवटीने एक तर या मशिदी उध्वस्त केल्या आहेत.

किंवा नुतनीकरणाच्या नावाखाली त्यांचा ताबा घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्माचे आचरण कोणत्याही माध्यमातून होऊ नये असे नियोजनबद्ध प्रयत्न चिनी सरकारने 2017 पासून चालवले आहेत.मुस्लिम वंशांचा नित्पात करण्याच्या या प्रयत्नांविरोधात एकही मुस्लिम देश उघडपणे बोलताना दिसत नाही. जेमतेम 90 लाख लोकसंख्येच्या चिमुकल्या इस्रायलविरोधात मात्र हीच बडी मुस्लिम राष्ट्रे दंड थोपटून उभे राहताना दिसतात. त्यांचे हेच उसने अवसान चीनविरोधी भूमिका घेताना कुठे जाते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुस्लिमांच्या पवित्र धर्माची पूजाअर्चा करण्याचे ठिकाण असल्याची कोणतीही खूण झिनजियांग प्रांतातील मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये असणाऱ्या बहुसंख्य मशिदींमध्ये उरलेली नाही. मशिदींच्या या दुरवस्थेचे फोटो काढण्यास स्थानिकांना बंदी घालण्यात आली आहे. परदेशी पत्रकार, वृत्तवाहिन्यांना या प्रदेशात मुक्त संचारास बंदी आहे.

चिनी सरकारने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार परदेशी पत्रकार किंवा वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधी या भागात गेले तरी त्यांच्याशी मोकळेपणाने कोणी बोलू शकत नाही. बोलले तरी स्वतःचा परिचय देण्याचे धाडस पश्चिम चीन प्रांतातील मुस्लिम करत नाहीत.

कम्युनिस्ट चिनी सरकारच्या दडपशाहीनंतर देखील उगार वंशीय मुस्लिमांची दुरवस्था काही प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून जगापुढे आली. हजारो मशिदींना लक्ष्य केल्याचे चित्र जगापुढे आले. त्यानंतर येथील कम्युनिस्ट चिनी सरकारने धोरणात बदल केला.

चिनी सरकारविरुद्धची टीका खोडून काढण्यासाठी स्थानिक प्रसारमाध्यमांमधून मोहिम उघडण्यात आली. सरकारतर्फे आयोजित केलेले दौरे या भागात काढण्यात आले. झिनजियांक आणि बिजिंग येथील सरकारी अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की,

या परिसरात कोणतेही धार्मिक स्थळ नष्ट केलेले नाही किंवा त्यावर प्रतिबंधही घालण्यात आलेले नाहीत. उलट आम्ही धर्मस्थळांच्या संरक्षणासाठी पावले उचलली आहेत. तुम्ही भेट देऊन पाहू शकता.

त्याचवेळी चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयांग यांनी स्पष्ट केले की, काही मशिदी पाडण्यात आल्या. तर ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत काहींचे पुनर्निमाण केले गेले. मुस्लिमांना त्यांच्या घरात धर्माचे मुक्त पालन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

असे असेल तर परदेशी पत्रकारांना या भागात मुक्तपणे संचार करण्याची परवानगी चीनचे कम्युनिस्ट सरकार का देत नाही, असा प्रश्न केला असता चुनयांग यांनी सांगितले, “चिनी नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी परदेशी पत्रकारांना आणखी कठोर प्रयत्न करावे लागतील. तसेच वस्तुनिष्ठ वार्तांकनही करावे लागेल.”

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी झिनजियांग प्रांतातल्या मध्य आणि नैऋत्य भागात नुकत्याच गुरुवारी संपलेल्या रमझानच्या महिन्यात बारा दिवसांचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी चोवीसपेक्षा जास्त मशिदींना भेट दिली.

त्यावेळी चिनी सरकारकडून मशिद संरक्षणाचे केले जाणारे दावे आणि वस्तुस्थिती यात प्रचंड तफावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रांतातल्या मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्य नसल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदवले. बहुतांश मशिदी एकतर पूर्ण ध्वस्त केल्या गेल्या होत्या किंवा अर्धवट पाडण्यात आल्या होत्या.

झिनजियांग प्रांतातल्या फुटीरतावाद्यांकडून आणि धार्मिक मूलतत्त्ववाद्यांकडून गंभीर धोका असल्याचे चीनकडून सातत्याने सांगितले जाते. या प्रदेशातील उगार मुस्लिम आणि मोठ्या प्रमाणात असणारा ‘हान’ हा पारंपरिक चिनी समूह या दोन गटात वितूष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न या मुस्लिम फुटीरतावाद्यांकडून आणि मूलतत्त्ववाद्यांकडून होत असल्याचा चीनचा आरोप आहे.

संख्येने सुमारे दहा लाखांच्या घरात असणाऱ्या उगार मुस्लिमांच्या विरोधात येथे 2017 पासून चीनी कम्युनिस्ट सरकार अत्याचार करत असल्याचे सांगितले जाते. प्रामुख्याने मुस्लिम धर्माचारणावर बंधने घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आधुनिक शिक्षण देण्याच्या नावाखाली बंदी छावण्यांमधून उगार मुस्लिमांना ठेवले जात आहे. झिनजियांग प्रांतात वीस हजारांहून जास्त मशिदी असल्याचा चिनी सरकारचा दावा आहे. परंतु, या मशिदींचा सद्यस्थिती काय याची माहिती उपलब्ध नाही.

ज्या मशिदी बऱ्या अवस्थेत आहेत त्या ठिकाणी अन्य प्रांतातील तसेच परदेशी व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी आहे. अठरा वर्षांखालील स्थानिक मुस्लिमसुद्धा या मशिदींमध्ये जाऊ शकत नाहीत. जे स्थानिक मुस्लिम मशिदीत जातात त्यांना नोंदणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

मशिदींमध्ये सीसीटीव्ही बसवणे आणि चीनी राष्ट्रध्वज फडकावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच चीनची सत्ताधीश असलेल्या कम्युनिस्ट पार्टीप्रती निष्ठा व्यक्त करण्याचेही बंधन उगार मुस्लिमांवर आहे.

झिनझियांग प्रांतातील मशिदींबद्दलची कोणतीही माहिती स्थानिक कम्युनिस्ट सरकार देत नाही. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी सन 2020 मध्ये झिनझियांग प्रांतातल्या 900 स्थळांचे सर्वेक्षण केले.

त्यांच्या मते, गेल्या तीन वर्षात येथील 16 हजार मशिदी एक तर पूर्ण उध्वस्त झाल्या आहेत किंवा त्यांची पडझड झाली आहे. (रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी झिनझियांग प्रांतास नुकतीच भेट देऊन केलेल्या वार्तांकनाच्या आधारे)

Anti-Israel sentiments of Muslim countries silenced in front of China, which oppresses Uyghur Muslims strategically

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण