अंबाला तुरुंगातील माती वापरून नथुराम गोडसेचा पुतळा उभारणार, हिंदू महासभेची घोषणा


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचा पुतळा उभारण्याची घोषणा हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे. ज्या तुरुंगात नथुराम गोडसेला ठेवण्यात आले आले त्याच हरियाणातल्या अंबाला मध्यवर्ती तुरुंगातली माती पुतळा उभारण्याच्या कामात वापरण्यात येणार आहे, असंही हिंदू महासभेनं म्हटले आहे.Statue of Nathuram Godse will be erected using prison soil, Hindu Mahasabha announces

ग्वालियरमध्ये बुधवारी हिंदू महासभेने गोडसे अध्ययन मालेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. ‘गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या करून देशातील लाखो हिंदूंचा सूड घेतला. मोहम्मद अली जिन्ना आणि नेहरू यांची पंतप्रधान बनण्याचा हट्ट यामुळेच गांधीजींनी देशाचं विभाजन केलं’ असा आरोप गांधीजींवर करण्यात आला आहे.


गोडसे जिंदाबाद ट्विट करणारे नागरिक बेजबाबदार : वरून गांधी


हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात अंबाला तुरुंगातून पुतळ्यासाठी माती आणली होती. याच तुरुंगात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना महात्मा गांधींच्या हत्येच्या गुन्ह्याखाली १५ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशी देण्यात आली होती. या निमित्तानं हिंदू महासभेनं गोडसे आणि आपटे यांची पुण्यातिथी साजरी केली. हिंदू महासभेकडून या दिवशी आपल्या कार्यालयात पूजा-अर्चना करत ‘बलिदान दिवस’ पाळण्यात येतो.

नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांच्या मूर्ती हिंदू महासभेच्या ग्वालियरच्या कार्यालयात स्थापित केल्या जातील, असं महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी म्हटलंय. मेरठच्या बलिदान धाममध्येही गोडसे आणि आपटेंच्या मूर्त्या स्थापित करण्यात आल्याची माहिती भारद्वाज यांनी दिली. प्रत्येक राज्यात याच पद्धतीनं ‘बलिदान धाम’ उभारणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

ग्वालियर जिल्हा प्रशासनानं हिंदू महासभेच्या कार्यालयात स्थापित करण्यात आलेली मूर्ती २०१७ मध्ये जप्त केली होती. अद्याप ही मूर्ती परत करण्यात आलेली नाही, असंही भारद्वाज यांनी म्हटलंय. १९४७ मध्ये देशाच्या विभाजनासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा दावाही भारद्वाज यांनी केला.

Statue of Nathuram Godse will be erected using prison soil, Hindu Mahasabha announces

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात