गोडसे जिंदाबाद ट्विट करणारे नागरिक बेजबाबदार : वरून गांधी


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : शनिवारी भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण गांधी यांनी राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे जिंदाबाद या ट्रेंड होणाऱ्या ट्विटरवरील हॅशटॅगची त्यांनी यावेळी निंदा केली आहे.

Those who has tweeted Godse Zindabad are irresponsible : Varun Gandhi

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताचा आध्यात्मिक पाया बळकट झाला आणि देशाला संघटित करणारे बळकट नेतृत्व गांधीजींमुळे भारताला मिळाले होते. ह्या महान व्यक्तीची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. तेव्हा ‘गोडसे जिंदाबाद’ असे ट्वीट करणारे लोक आपल्या स्वातंत्र्याविषयी इतके बेजबाबदारपणे कसे वागू शकतात असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. देशासाठी हे लज्जास्पद आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.


Nathuram Godse:’गोडसे’ सिनेमा आणणार! महेश मांजरेकरांची गांधी जयंतीच्या दिवशी मोठी घोषणा


#नाथूरामगोडसेजिंदाबाद (नथुराम गोडसे जिंदाबाद) हा  शनिवारी ट्विटरवरील सर्वात जास्त वापरला गेलेला ट्रेंड होता.  हे अनेक ट्विटर वापरकर्त्यांना धक्का देणारे आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटमध्ये एक अल्गोरिदम आहे जो एका विशिष्ट विषयाला ट्रेंड करण्यास सक्षम करतो. यावर ट्विटरने म्हटले आहे की, युजरच्या भौगोलिक स्थळ, त्यांच्या आवडी आणि त्यांनी हाताळलेल्या पोस्ट्स, त्यांचे लाइक्स, त्यांचे कमेंट्स या सर्व घटकांच्या आधारावर ट्विटर युजरला ट्रेंड सजेस्ट करत असतो.

Those who has tweeted Godse Zindabad are irresponsible : Varun Gandhi

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात