पूर्वांचल एक्सप्रेस वे वर झालेल्या विमानांच्या गर्जना काय सांगताहेत…??; वाचा पंतप्रधानांच्या भाषणातून…!!


वृत्तसंस्था

सुलतानपूर : उत्तर प्रदेशाच्या विकासाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी लढाऊ विमानांनी पूर्वांचल एक्सप्रेस वे च्या धावपट्टीवरून उड्डाण करून थरारक कसरती सादर केल्या, या विमानांच्याची गर्जना काय ओरडून सांगतात, ते ऐका असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 60 – 70 वर्षांमधल्या सरकारांवर निशाणा साधला आहे. What do the roars of the planes on Purvanchal Expressway say … ??; Read from the speech of the Prime Minister … !!

या विमानांच्याची गर्जना गेल्या 70 वर्षांमध्ये विविध सरकारांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या पायाभूत सुविधांकडे जे दुर्लक्ष केले आहे ते ओरडून सांगत आहेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्राशी अनेक सरकारांनी नुसता खेळ केला. संरक्षण पायाभूत सुविधा मजबूत केल्या नाहीत. देशाचा विकास जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच देशाच्या सर्व सीमांचे आणि देशाचे संरक्षण तितकेच महत्त्वाचे आहे, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

342 किलोमीटर लांबीच्या नऊ जिल्हे जोडणाऱ्या पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन मोदींनी केले. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या अनेक विमानांनी एक्सप्रेस वे च्या धावपट्टीवरून उड्डाणे करत थरारक कसरती केल्या. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लाखो लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

या कार्यक्रमात केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मधल्या आधीच्या सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, आधीच्या सरकारांनी संपूर्ण पूर्वांचल भाग हा गुंड – माफियांना जणू दत्तक देऊन टाकला होता. विकासाकडे सरकारांचे पूर्ण दुर्लक्ष तर होतेच, पण पूर्वांचल याच्या सर्व जिल्ह्यात मधली कायदा-सुव्यवस्था इतकी बिघडली होती की गुंड – माफिया यांनी स्वतःची समांतर न्यायव्यवस्था येथे निर्माण केली होती. केंद्रात 2014 मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर आणि 2017 मध्ये उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमत असे सरकार आल्यानंतर दोन्ही सरकारांनी मिळून पूर्वांचलातील गुंड आणि माफियागिरी कायद्याच्या बडग्याने मोडून काढली आणि पूर्वांचलच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले.

तीनच वर्षांपूर्वी पूर्वांचलातील पूर्वांचल एक्सप्रेस वे चे भूमिपूजन मी केले होते. मला कल्पनाही नव्हती साडे तीन-चार वर्षांमध्ये इतका सुंदर एक्सप्रेस वे येथे तयार होईल आणि भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने इथल्या धावपट्टीवर उतरून विकासाचा नवा मार्ग खुला करतील. परंतु आज विकासाचे महाद्वार पूर्वांचल मध्ये उघडले गेले आहे. या विमानांच्या गर्जनांनी हे ओरडून सांगितले आहे की गेल्या 60 – 70 वर्षामध्ये अनेक सरकारांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते. पण इथून पुढे अजिबात असे दुर्लक्ष होणार नाही. देशाच्या विकासाबरोबरच संरक्षण क्षेत्रही तितकेच मजबूत केले जाईल, अशी ग्वाही मी आपल्याला देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित होते.

What do the roars of the planes on Purvanchal Expressway say … ??; Read from the speech of the Prime Minister … !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती