मोठी बातमी : उद्यापासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा


केंद्र सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर १७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ‘एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा फायदा मोठ्या संख्येने शीख यात्रेकरूंना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर उद्यापासून म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मोदी सरकारचा श्रीगुरु नानक देवजी आणि आपल्या शीख समुदायाप्रति असलेला अपार आदर दर्शवतो.” Amit Shah says Central Govt decided to re open the Kartarpur Sahib Corridor from 17 Nov


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर १७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ‘एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा फायदा मोठ्या संख्येने शीख यात्रेकरूंना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर उद्यापासून म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मोदी सरकारचा श्रीगुरु नानक देवजी आणि आपल्या शीख समुदायाप्रति असलेला अपार आदर दर्शवतो.”

कोरोना व्हायरस महामारीमुळे मार्च 2020 मध्ये करतारपूर साहिब गुरुद्वाराची यात्रा स्थगित करण्यात आली होती. तत्पूर्वी, पंजाबमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना गुरुपर्वच्याआधी करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. भाजपच्या पंजाब युनिटच्या अध्यक्षा अश्विनी शर्मा यांनी सांगितले की, 11 राज्यांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना गुरु नानक देवजींच्या अनुयायांच्या भावनांची माहिती दिली.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट केले आणि म्हटले, ‘स्वागत आहे, अनंत शक्यतांचा कॉरिडॉर पुन्हा उघडला गेला आहे. नानक नाव घेणाऱ्यांना एक अनमोल भेट. सर्वांवर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी महान गुरूंचा मार्ग सदैव खुला राहो.

Amit Shah says Central Govt decided to re open the Kartarpur Sahib Corridor from 17 Nov

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात