विशेष प्रतिनिधी
डेहराडून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोअर ग्रुपच्या चिंतन बैठकीच्या दुसऱ्या दिवशी शताब्दी वर्षात संघाच्या ध्येयाबाबत चर्चा झाली. यादरम्यान संघाच्या राष्ट्रीय विचारांना जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी देशातील प्रत्येक गावात संघाच्या शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. Sangh branches will be started in every village
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रायवाला येथील औरवली आश्रमाच्या विश्व मंदिरात संघाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत शाखांच्या विस्तारासाठी आणि प्रथम आणि द्वितीय प्रशिक्षण वर्गाच्या शिबिरांचे आयोजन करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली. आरएसएस २०२५ मध्ये शताब्दी वर्ष पूर्ण करत आहे.
शताब्दी वर्षात देशातील प्रत्येक प्रांतात संघाच्या शाखा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या बैठकीत संघकार्यवाह दत्तात्रेय होसाबोळे, सहकार्यवाह मनमोहन वैद्य उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App