रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सेवेला रेल्वेमंत्र्यांचा सलाम


लॉकडाऊन काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी जिद्दीने दिलेल्या सेवेला रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सलाम केला आहे. लॉकडाऊन असतानाही रेल्वेने दिलेल्या सेवेबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला आहे. Railway Minister salutes the service of railway employees


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लॉकडाऊन काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी जिद्दीने दिलेल्या सेवेला रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सलाम केला आहे. लॉकडाऊन असतानाही रेल्वेने दिलेल्या सेवेबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला आहे.

लॉकडाऊनमध्येच गेल्या वर्षभरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल  गोयल यांनी देशभरातल्या सर्व रेल्वे कर्मचाºयांना खुले पत्र लिहिले आहे. गोयल यांनी म्हटले आहे, कोविड-१९ च्या काळात आपल्या रेल्वेनं देशाच्या सेवेसाठी स्वत:ला झोकून दिलं. जेव्हा सारं जग थांबलं होतं, तेव्हा तुम्ही एकही दिवसाची सुटी न घेता अर्थव्यवस्था चालती ठेवण्यासाठी अतिजोखमीच्या वातावरणात काम करत राहिलात.



तुमच्यामुळेच आपण करोना काळातही देशभरात जीवनावश्यक गोष्टींचा अविरत पुरवठा करू शकलो. करोना काळात देशभरात अडकलेल्या तब्बल ६३ लाख नागरिकांची पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याचं काम आपण केलं. यासाठी आपण ४ हजार ६२१ श्रमिक स्पेशल ट्रेन देखील चालवल्या. ३७० मोठी कामं आपण पूर्ण केली. शेतकºयांचा माल थेट बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी किसान रेल सर्विसनं मोठा वाटा उचलला आहे. यातून तुम्हा लाखो देशवासीयांच्या मनात स्थान मिळवलं आहे.

रेल्वेमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानताना म्हटले आहे की, तुमची निष्ठा आणि जबरदस्त कामगिरीसाठी मी तुमचे आभार मानतो. या आत्मविश्वासाने भारलेल्या टीमसोबत आपण अजून अनेक विक्रम मोडणार आहोत, मोठमोठी लक्ष्य गाठणार आहोत, इतरांसमोर आदर्श ठेवणार आहोत आणि भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणार आहोत.


महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात