Corona In Maharashtra : महाराष्ट्राने गाठला कोरोना रुग्णांचा उच्चांक, एकाच दिवसात तब्बल ४९,४४७ नवीन रुग्णांची नोंद

विशेष प्रतिनिधी

मुंबई – राज्यात गेले पाच दिवस उच्चांकी रुग्णांची नोंद होत असून आज तब्बल ४९,४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभरातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २९,५३,५२३ झाली आहे. तर आज राज्यात मृत्यूचा आकडा देखील भयावह वाढला असून शनिवारी तब्बल २७७ मृत्यूची नोंद झाली. (Corona In Maharashtra)

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के एवढा आहे. Maharashtra records highest corona patients and deathsआज ३७,८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २४,९५,३१५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra records highest corona patients and deaths


महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*