Cases Of Corona In Maharashtra Rapidly Increasing, more than thirty thousand patients found in a day, 99 deaths

Corona In Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! एका दिवस 30,535 रुग्ण, 99 मृत्यू

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला असून मागच्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 197 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रात (Corona In Maharashtra) एका दिवसात 30,535 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूरमध्ये वाढत्या संसर्गामुळे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन लादण्यात आले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला असून मागच्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 197 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रात (Corona In Maharashtra) एका दिवसात 30,535 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूरमध्ये वाढत्या संसर्गामुळे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन लादण्यात आले आहे.

महाराष्ट्रात वेगाने वाढतोय संसर्ग

रविवारी महाराष्ट्रात 30,535 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 99 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 9,69,867 जण आपल्या घरी विलगीकरणात आहेत. तर कोविड सेंटरमध्ये 9,601 जण दाखल आहेत. महाराष्ट्रात एकूण 2,10,120 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी आज 11,314 रुग्णांना सुटी देण्यात आली. राज्यात बरे होण्याचा दर 89.32% आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 24,79,682 जण कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत.

त्याचवेळी मुंबईत मागच्या 24 तासांत कोरोनाचे 3775 नवीन रुग्ण आढळले. 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातही 1647 जण बरे होऊन घरी गेले. नागपुरात 3614 नवीन रुग्ण आढळले, येणे 32 जणांचा मृत्यू झाला.

देशात लसीकरणाचा आकडा साडेचार कोटींजवळ

या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरणही सुरू आहे. रविवारपर्यंत एकूण 4,46,03,841 जणांना कोरोनावरील लस देण्यात आलेली आहे. लसीकरण मोहिमेच्या 64व्या दिवशी 25 लाखांहून जास्त जणांना लसीचे डोस देण्यात आले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*