Corona-infected Farooq Abdullah admitted to hospital for better Treatment, says Omar Abdullah

कोरोना संक्रमित फारुख अब्दुल्ला रुग्णालयात दाखल, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली माहिती

Farooq Abdullah : मंगळवारी (30 मार्च 2021) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती त्यांचे सुपुत्र आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली आहे. Corona-infected Farooq Abdullah admitted to hospital for better Treatment, says Omar Abdullah


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : मंगळवारी (30 मार्च 2021) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती त्यांचे सुपुत्र आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली आहे.

लस घेतल्यानंतर लागण

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर सुमारे 28 दिवसांनंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना कोविड -19चा संसर्ग झाला. त्यानंतरही फारुख अब्दुल्ला यांचे सुपुत्र आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले होते. त्यांनी गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या सर्व लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहनही केले होते.

ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट

आज ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे की, ‘माझे वडील फारुख अब्दुल्ला यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उत्तम उपचारांसाठी श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या संकटाच्या वेळी ज्यांनी संदेश पाठविला व पाठिंबा दर्शविला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

अब्दुल्ला कुटुंबीय क्वारंटाइन

फारुख अब्दुल्ला यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समजल्यावर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना तपासणी झाली असून इतर कोणालाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले नाही. फारुख अब्दुल्ला यांनी 2 मार्च रोजी शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, श्रीनगर येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

Corona-infected Farooq Abdullah admitted to hospital for better Treatment, says Omar Abdullah

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*