धर्मनिरपेक्ष केरळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर झुकणार नाही, मुख्यमंत्री पी. विजयन यांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी

कन्नूर – केरळ हा धर्मनिरपेक्ष विचारांचा बालेकिल्ला असून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर झुकणार नाही. काँग्रेस आणि भाजपने राज्याच्या प्रगतीला मारक अशीच भूमिका घेतली. आता हीच मंडळी विकासाच्या गप्पा मारत आहेत, त्यांचे हेच कृत्य लोकांच्या तोंडात मारण्यासारखे असल्याची टीका केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली. Kerala CM attacks on RSS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आतापर्यंत केरळमध्ये फूट पाडण्याचे काम केले असून त्यांचे हे प्रयत्न राज्यामध्ये यशस्वी झालेले नाहीत. केरळ हा धर्मनिरपेक्षतेचा बालेकिल्ला असल्याचा विश्वा्स देखील विजयन यांनी व्यक्त केला.संघाच्या जातीयवादासमोर केरळ मान तुकवायला तयार नसल्याने ही मंडळी राज्याला त्याचीच शिक्षा देत आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोघेही एकमेकांचे भाऊ आहेत. त्यांची ही छुपी युती राज्यातील जनतेला माहिती आहे. मागील निवडणूक प्रचारामध्ये पंतप्रधान मोदी यांनी केरळची तुलना सोमालियासोबत केली होती. संघ परिवाराला केरळची प्रतिमा कलुषित करायची आहे.

Kerala CM attacks on RSS


महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*