केरळमध्ये ४० लाख नवे रोजगार, गृहिणींना पेन्शन, डाव्या आघाडीच्या जाहीरनाम्यात वारेमाप आश्वासने

विशेष प्रतिनिधी

तिरूअनंतपुरम – केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यामध्ये ४० लाख नवे रोजगार निर्माण करण्याबरोबरच सर्व गृहिणींना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. LDF releases poll manifesto in kerala election

आज माकपचे राज्य प्रभारी ए. विजयराघवन यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. लाइफ मिशन अंतर्गत राज्यामध्ये आदिवासी आणि अनुसूचित जातींसाठी घरे उभारली जाणार असून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे यश असल्याचेही या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.सर्व गृहिणींना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे, ती नेमकी कशी असेल याबाबत विजयराघवन यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले. सामाजिक सुरक्षा निवृत्तिवेतनामध्ये विविध टप्प्यांत अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.’

The Congress has sold itself out, Kerala Chief Minister Pinarayi Vijayan alleged

LDF releases poll manifesto in kerala election

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*