मालीत शस्त्रसज्ज जिहादींनी केलेल्या हल्ल्यात चार शांतीदूतांचा करूण मृत्यू

विशेष प्रतिनिधी

बामको – मालीच्या उत्तरेकडील अजेलहोक येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदूतांच्या शिबिरावर जिहादींनी केलेल्या हल्ल्यात चार शांतीरक्षकांचा मृत्यू झाला व १९ जण जखमी झाले. Four peace envoys were killed in an attack by armed jihadists in Mali

‘शस्त्रसज्ज जिहादींनी केलेल्या या हल्ल्याचा यूएन’चे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी निषेध केला असून हा हल्ला परवून लावणाऱ्या शांतीदूतांच्या धैर्याचे व धाडसाचे कौतुक केले असल्याचे ‘यूएन’चे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी सांगितले.

शांतीदूतांवर हल्ला करणाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत युद्ध गुन्हे दाखल होतील आणि त्यातील दोषींवर निर्बंध लादले जातील, असेही गुटेरस यांनी सांगितले. मालीत गेल्या महिन्यातही ‘यूएन’च्या अस्थायी संचलन केंद्रावर हल्ला झाला होता. त्यात एका शांतीदूताचा मृत्यू झाला होता तर २८ जण जखमी झाले होते.

मालीतील ‘यूएन’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की चारही शांतीदूत हे चाड प्रजासत्ताकमधील होते. या शिबिरातील बहुतेक शांतिदूत याच देशातील आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. या हल्ल्यात हल्लेखोरांचीही मोठी जीवित हानी झाली आहे.

Four peace envoys were killed in an attack by armed jihadists in Mali

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*