बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगाराचे झाले ओझे, सुट्या नाण्यांच्या स्वरुपात दिला जातोय पगार


मुंबईची जीवनवाहिनी सध्य बेस्ट ही बससेवा झाली आहे. तिकिटाचे दर पाच रुपयांच्या पटीत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाच आणि दहा रुपयांची नाणी गोळा होत आहेत. या नाण्यांचे काय करायचे म्हणून त्याचे ओझे बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर टाकले जात आहे. चक्क नाण्यांच्या स्वरुपात पगार दिला जात आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी सध्य बेस्ट ही बससेवा झाली आहे. तिकिटाचे दर पाच रुपयांच्या पटीत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाच आणि दहा रुपयांची नाणी गोळा होत आहेत. या नाण्यांचे काय करायचे म्हणून त्याचे ओझे बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यां वर टाकले जात आहे. चक्क नाण्यांच्या स्वरुपात पगार दिला जात आहे.

बेस्ट कामगारांच्या पगारातील काही रक्कम सुट्ट्या नाण्यांच्या रूपात दिला जात आहे. मार्चच्या पगारात तर त्याचा कळस गाठण्यात आला असून, तब्बल १५ हजार रुपयांची रक्कम पाच ते दहा रुपयांच्या नाण्यांच्या व नोटांच्या स्वरूपात देण्यात आली आहे.बेस्टच्या परिवहन सेवेतून उपक्रमाच्या खात्यात दैनंदिन स्तरावर ५ आणि १० रु.ची प्रचंड नाणी जमा होत असतात. ही नाणी बँकेत जमा करण्यासाठी एका बड्या सार्वजनिक बँकेशी करार करण्यास बेस्ट समितीने उपक्रमास मंजुरी दिली आहे. पण त्याची पूर्तता न झाल्याने जानेवारी, २०२१पासून नाण्यांचा साठा पडून आहे. नाण्यांचा हा डोंगर कमी करण्यासाठी कामगारांना पगारात नाणी देण्याची कल्पना अंमलात आली आहे. सन २०१९मध्ये नाण्यांच्या समस्येतून मुक्तता मिळविण्यासाठी उपक्रमाने हा तोडगा काढला होता. यंदाचा मार्चचा पगार देताना कळस साधत बेस्टने तब्बल १५ हजार रुपयांची रक्कम नाण्यांच्या रूपात दिली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही त्यावर चर्चा झाली. बेस्ट उपक्रमातील मनुष्यबळ साधारण ४० हजारांपर्यंत आहे. त्यापैकी बहुतेकांना यापैकी नाण्यांच्या रूपात पगार दिला जातो. केवळ नाण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून ती कामगारांच्या माथी मारली जात असल्याबद्दल टीकाही झाली आहे. बैठकांमध्येही बेस्ट समिती सदस्यांनी याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.


महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात