एप्रिलच्या मध्यात महाराष्ट्रात होणारा कोरोनाचा विस्फोट, संशोधकांचे भाकीत, मेच्या अखेरपासून बाधितांचे प्रमाण घटणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट ही एप्रिलच्या मध्यावधीत शिखर गाठणार असून मेच्या अखेरीपासून हा संसर्ग कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संशोधकांनी एका गणितीय आराखड्याच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. आताच्या लाटेत सर्वप्रथम पंजाबमध्ये संसर्ग वाढेल आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात याचा उद्रेक पाहायला मिळेल असे संशोधकांचे म्हणणे आहे. या आराखड्याला त्यांनी सूत्र असे नाव दिले आहे. Corona will peak in Maharashtra mid aprilआयआयटी कानपूरमधील संशोधक मनिंद्र अग्रवाल यांनी सद्यस्थितीमध्ये कोरोनाच्या स्थितीला हीच गणितीय फुटपट्टी लावून नव्याने काही अंदाज वर्तविले आहेत. सध्याचा देशभर पसरत चाललेला संसर्ग हा एप्रिलच्या मध्यावधीत शिखरस्थानी पोचेल असा त्यांचा कयास आहे.

मेच्या अखेरपासून देशातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होऊ लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
याआधी देशामध्ये संसर्गाची पहिली लाट आली होती तेव्हा तिच्याबाबत अंदाज वर्तविण्यासाठी याच आराखड्याचा आधार घेण्यात आला होता. त्यावेळी संशोधकांनी ऑगस्टमध्ये वाढलेला संसर्ग हा सप्टेंबरमध्ये शिखरस्थानी पोचेल आणि २०२१ च्या फेब्रुवारीपासून तो ओसरायला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविला होता.

हरियानातील अशोका विद्यापीठातील संशोधक गौतम मेनन यांनी वेगळ्या आराखड्याचा वापर केला आहे. त्यांच्या मते हा संसर्ग एप्रिल किंवा मेच्या मध्यावधीत शिखरस्थानी पोचू शकतो.

Corona will peak in Maharashtra mid april


महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था