भारत, चीन सोबत नासाने शेअर केला मंगळ मोहिमेचा डेटा, अंतराळातील संभाव्य अपघात टळणार

विशेष प्रतिनिधी

बिजिंग – अंतराळातील अपघात टाळण्यासाठी नासाने नुकत्याच पार पडलेल्या मंगळ मोहिमेचा डेटा चीन, भारत, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि युरोपियन स्पेस एजन्सीसोबत शेअर केला आहे. Nasa SHARES INFORMATION WITH iNDIA mars

सध्या नासाचे अंतराळयान हे मंगळाभोवती घिरट्या घालत असून अन्य देशांना त्यांच्या मोहिमांची आखणी करताना याची माहिती मिळू शकेल.

भारताने २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेमध्ये अंतराळयान पाठवून मंगळयान मोहीम फत्ते केली होती. ही मजल मारणारा भारत हा आशियातील पहिला देश बनला आहे. सध्या नासाचे पर्सिव्हरन्स हे रोव्हर मागील महिन्यामध्येच मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले होते. 

सध्या ते मंगळाच्या भूमीवर फिरते आहे. चीनचे तियानवेन-१ हे यान देखील लवकरच मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरचा समावेश असून चीनचे रोव्हर देखील लवकरच मंगळावर उतरणार आहे. संयुक्त अरब अमिरातीचे होप हे अंतराळयान सध्या मंगळाच्या कक्षेमध्ये असून युरोपियन अंतराळ संस्थेची दोन याने सध्या मंगळाच्या कक्षेमध्ये आहेत.

अंतराळ मोहिमांच्या सुरक्षेसाठी नासा संयुक्त अरब अमिराती, युरोपियन स्पेस एजन्सी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थांसोबत समन्वय ठेवून आहे. सध्या या सगळ्या संस्थांची अंतराळयाने मंगळाभोवती घिरट्या घालत आहेत. अन्य देशांनी त्यांच्या मोहिमा आखताना तिथे नासाचे देखील अंतराळयान आहे, याचे भान ठेवावे म्हणून ही पूर्वसूचना देण्यात आली आहे.

Nasa SHARES INFORMATION WITH iNDIA mars


महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*