रेल्वेमध्ये धूम्रपान करणाऱ्याना आता कडक शिक्षा

दिल्ली-डेहराडून शताब्दी एक्सप्रेसला लागलेली आग ही सिगारेट किंवा बिडीमुळे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गाडीत सिगारेट-बिडी ओढणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे. जबर दंडासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्याखाली अटकही होऊ शकते.Strict punishment for those who smoke in trains


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली-डेहराडून शताब्दी एक्सप्रेसला लागलेली आग ही सिगारेट किंवा बिडीमुळे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गाडीत सिगारेट-बिडी ओढणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे. जबर दंडासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्याखाली अटकही होऊ शकते.

दिल्ली-डेहराडून शताब्दी एक्सप्रेसला भीषण आग लागली होती. प्राथमिक तपासात शौचालयातील कचरापेटीत जळती सिगारेट फेकल्याने ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या कचरापेटीत टिश्यू पेपर ठेवण्यात आले होते. १३ मार्च रोजी उत्तराखंडमधील रायवालाजवळ हा अपघात झाला होता.रेल्वेच्या कायद्यातील कलम १६७ नुसार कोणीही रेल्वेमध्ये धूम्रपान करताना आढळल्यास त्याला होणारा जास्तीत जास्त दंड १०० रुपये आहे. त्यामुळे हा कायदा परिणामकारक नाही. त्यामुळे हा कायदा आणखी कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य आणि महाव्यवस्थापकांची एक बैठक घेतली. रेल्वेमध्ये धूम्रपान करण्यापासून प्रवाशांना रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. यामुळे सहप्रवाशांना त्रास होतोच, पण अपघातही होऊ शकतात, असे सांगण्यात आले.

रेल्वेमध्ये धूम्रपान करणे त्अत्यंत धोकादायक ठरू शकते. कारण धावत्या रेल्वेमध्ये वेगाने वारे येत असल्याने आग भडकू शकते. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्याना रोखण्यासाठी कडक शिक्षा करण्यात येणार आहे.

Strict punishment for those who smoke in trains

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*