बिहारमध्ये तेजस्वी यादव, मीसा भारतींसह सहा जणांवर एफआयआर, पाच कोटी घेऊन तिकिटे न दिल्याचा आरोप

patna civil court ordered to fir against six people including tejashwi yadav and misa bharti in 5 Crore Fraud

patna civil court : कोर्टाने तेजस्वी यादव, मीसा भारती, राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा लहान मुलगा आणि विरोधी पक्षनेता यांच्यासह सहा जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पाटणा दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार पत्र प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणात एफआयआरसाठी तक्रार पत्र शहर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्याच्या नावाखाली पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे. तेजस्वी यादवांवर जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. patna civil court ordered to fir against six people including tejashwi yadav and misa bharti in 5 Crore Fraud


विशेष प्रतिनिधी

पाटणा : कोर्टाने तेजस्वी यादव, मीसा भारती, राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा लहान मुलगा आणि विरोधी पक्षनेता यांच्यासह सहा जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पाटणा दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार पत्र प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणात एफआयआरसाठी तक्रार पत्र शहर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्याच्या नावाखाली पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे. तेजस्वी यादवांवर जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

काँग्रेस नेते आणि वकील संजीवकुमार सिंह यांनी गेल्या महिन्यात 18 ऑगस्ट रोजी पाटण्याच्या सीजेएम न्यायालयात तक्रार पत्र दाखल केले होते. त्यात संजीवकुमार सिंह यांनी बिहार विधानसभेत तेजस्वी यादव, राज्यसभा सदस्य मीसा भारती आणि बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांच्यासह सहा जणांवर आरोप केले आहेत. यानंतर 16 सप्टेंबर रोजी पाटण्याचे एसएसपी उपेंद्र शर्मा यांच्यामार्फत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले.

काँग्रेस नेते आणि वकील संजीवकुमार सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) तिकीट देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतले. पैसेही घेतले गेले आणि त्यांना तिकीटही देण्यात आले नाही. यानंतर त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले, पण त्यावेळी ते मिळाले नाही. आता न्यायालयाने याप्रकरणी आदेश दिले आहेत. आदेश आल्यानंतर ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याकडून स्पष्टीकरणही येऊ लागले आहे.

patna civil court ordered to fir against six people including tejashwi yadav and misa bharti in 5 Crore Fraud

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण