इस्रोची दारे आता खासगी स्टार्टअपसाठी खुली, अग्निकुल’, ‘स्कायरूट’शी सामंजस्य करार


विशेष प्रतिनिधी

बंगळूर – देशाच्या अवकाश विभागाने यासाठी ‘अग्निकुल कॉसमॉस’ या अवकाश स्टार्टअपसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे इस्रोची दारे आता खासगी स्टार्टअपला खुली झाली आहेत. आता ‘अग्निकुल’च्या संशोधकांना इस्रोच्या सर्व सेवांचा लाभ घेता येणार असून त्यांना तज्ञ्जांचे मार्गदर्शन देखील मिळू शकेल.Private start up will do work with ISRO

उपग्रह प्रक्षेपकासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक उपप्रणालींच्या चाचण्यांसाठी ‘अग्निकुल’ला इस्रोच्या संसाधनांचा वापर करणे शक्य होईल. इस्रोची देशभर विविध चाचणी केंद्रे असून या स्टार्टअपला त्यांचा वापर करणे शक्य होणार आहे.



आयआयआटी मद्रासमध्ये हे ‘अग्निकुल स्टार्टअप’ असून उपग्रह प्रक्षेपक वाहक प्रणालीच्या चाचण्यांसाठी या स्टार्टअपला थेट ‘इस्रो’ची मदत घेता येईल.अवकाश विभागाने मागील आठवड्यात हैदराबादेतील ‘स्कायरूट एअरोस्पेस’ या स्टार्टअपशी अशाच प्रकारचा सामंजस्य करार केला होता.

त्यामुळे त्यांनाही इस्रोच्या सर्व केंद्रे आणि प्रणालींचा वापर करता येईल. येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील बेलाट्रिक्स एअरोस्पेसमधील अवकाशयान संशोधन प्रयोगशाळेचे नुकतेच ‘इस्रो’ प्रमुखांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. या प्रयोगशाळेमध्ये सर्व प्रकारची उपकरणे आणि प्रणालींच्या चाचण्या घेणे शक्य आहेत.

Private start up will do work with ISRO

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात