बंगळूरला वृत्तपत्र संपादकाच्या कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या


 

बंगळूर – बंगळूरच्या बॅडरहळ्ळी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात तिगरपाळ्य येथे राहणाऱ्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाच्या घरातील पाच सदस्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यात नऊ महिन्यांच्या एका बालकाचाही समावेश आहे.Five peoples commits suicide from one family

भारती (वय ५०), सिंचन (वय ३३), सिंधुराणी (वय ३०) आणि मधुसागर (वय २७) यांनी आत्महत्या केली. याव्यतिरिक्त, नऊ महिन्यांचे एक बाळ मृतावस्थेत सापडले.पाच दिवसांपूर्वीच घरी ही आत्महत्या केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.कौटुंबिक कलह आत्महत्येचे कारण असल्याचे समजते. घरात एकूण ६ लोक होते. गेल्या पाच दिवसांपासून केवळ ३ वर्षांचे मूल अन्नाशिवाय जगले आहे. मुलाला सध्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॅडरहळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला.

Five peoples commits suicide from one family

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण