पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन मंडपातच, कोरोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी निर्णय


वृत्तसंस्था

पुणे : गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पुणे, मुंबईत निर्बंध लागू आहेत. पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही.Immersion of Pune five main Ganapatis and others in pendals; Decision to avoid crowds due to corona crisis

दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशीला आज कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.



मानाच्या आणि महत्वाच्या गणपती मंडळांनी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय घेतला आहे. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमधे आज विसर्जनानिमित्त सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. बंदोबस्तासाठी सात हजार पोलिस तैनात आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झाली. विसर्जन सोहळा भक्तांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

दरम्यान, गणेश विर्सजनावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवून मुर्तीच्या विसर्जनाचे योग्य नियोजन करावे आणि कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले होते.

पुण्यातील गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा

  • मानाचा पहिलाश्री कसबा गणपती – सकाळी ११ वा.
  • मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी – सकाळी ११.४५ वा.
  • मानाचा तिसरा गुरुजी तालीम – दुपारी १२.३० वा.
  • मानाचा चौथा श्री तुळशीबाग – दुपारी १.१५ वा.
  • मानाचा पाचवा केसरी वाडा – दुपारी २ वा.
  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती – दुपारी २.४५ वा.
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई-  संध्याकाळी ६.३६ वा.

Immersion of Pune five main Ganapatis and others in pendals; Decision to avoid crowds due to corona crisis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात