उत्तर प्रदेशातील सत्तावाटपाची ओमप्रकाश राजभर यांची अजब योजना, पाच वर्षांत पाच मुख्यमंत्री देणार, चार उपमुख्यमंत्री आणि तेही दरवर्षी बदलणार


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील भागिदारी मोर्चाचे प्रमुख आणि सुहलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी सत्तेवर आल्यास सत्तावाटपाची अजब योजना मांडली आहे. पाच वर्षांत पाच पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदासाठी संधी देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.Omprakash Rajbhar’s strange plan for power sharing in Uttar Pradesh, will give five Chief Ministers in five years, four Deputy Chief Ministers and that too will change every year

राजभर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दहा पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. राजभर म्हणाले, आम्ही २०२२ साली विधानसभा निवडणुका जिंकल्या तर दरवर्षी नवा मुख्यमंत्री असेल. पाच वर्षांत पाच मुख्यमंत्री असतील. त्यामध्येही मुस्लिम, राजभर, चौहान, कुशवाहा आणि पटेल समाजाचे मुख्यमंत्री होतील. त्याचबरोबर आम्ही चार उपमुख्यमंत्री नेमू. त्यांनाही दरवर्षी बदलू. त्यामुळे पाच वर्षांत २० जणांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल.

राजभर यांच्या नेतृत्वाखाली भागिदारी संकल्प मोर्चा या आघाडीची स्थापना झाली आहे. त्यामध्ये दहा पक्ष सामील झाले आहेत. ही आघाडी उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व ४०३ विधानसभेच्या जागा लढवेल आणि त्यापैकी तीनशेहून अधिक जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजभर यांचा सुहलदेव समाज भारतीय पार्टी हा पक्ष पूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होता. राजभर यांच्या म्हणण्यानुसार, जातव्यवस्था हे समाजाचे वास्तव आहे. प्रत्येक पक्ष हा जातीवरच निवडणूक लढवित असतो. भारतीय जनता पक्षावर आरोप करताना ते म्हणाले की केशवप्रसाद मौर्य यांच्या नावावर मागासवर्गीयांची मते मिळवायची आणि उत्तराखंडमधील माणूस आणून मुख्यमंत्री करायचा हे आम्ही करणार नाही.

मागासवर्गीय समाजाचे लोक मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना संधी मिळण्याची वाट पाहत आहे. माागासवर्गीयांच्या मतांवर मुख्यमंत्री बनायचा असेल तर आमच्या आघाडीचा मुख्यमंत्री का नाही? आम्ही प्रत्येक समाजाला मुख्यंमत्रीपदासाठी संधी मिळावी यासाठी दरवर्षी मुख्यमंत्री बदलू.

Omprakash Rajbhar’s strange plan for power sharing in Uttar Pradesh, will give five Chief Ministers in five years, four Deputy Chief Ministers and that too will change every year

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात