अजितदादांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त


वृत्तसंस्था

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर सक्तवसूली संचलनालयाने अर्थात ED ने जप्तीची कारवाई केली. ED attaches properties of M/s Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana situated at Chimangaon, Koregaon, Satara, Maharashtra

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 65,75,00,000 एवढ्या रकमेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ED ने ही कारवाई केली आहे. २००२ च्या मनी लाँड्रिंग अँक्टखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. त्यावेळी कोरेगावच्या माजी आमदार आणि महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. जरंडेश्वर साखर कारखान्यावरील थकीत कर्जामुळे तो लिलावात काढला होता. शिखर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. या लिलावातच हेतूपरस्सर गैरव्यवहार आणि पैशाची अफरातफर करण्यात आली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.अजित पवार यांच्या नातेवाईकाने ज्याच्या गुरू कमॉडिटी सर्विसेस प्रा. लि. या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटींहून कमी होती त्या कंपनीने हा 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साखर कारखाना खरेदी केला होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ED ने ही कारवाई केली आहे.

याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.

ED attaches properties of M/s Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana situated at Chimangaon, Koregaon, Satara, Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण