केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोव्हिशील्ड लसीला 9 युरोपीय देशांनी दिली मान्यता, कोव्हॅक्सिनबद्दलही गुड न्यूज

Covishield vaccine approved by 9 European countries, also good news about covaxin

Covishield vaccine : ज्यांना भारतात कोव्हिशील्ट लस घेतली आहे आणि आगामी काळात त्यांना युरोपियन देशात जायचे असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर युरोपच्या 9 देशांनी सीरमच्या कोव्हिशील्ड लसीला मंजुरी दिली आहे. आता कोव्हिशील्ड लस घेणारेही युरोपच्या या देशांमध्ये जाऊ शकतील. Covishield vaccine approved by 9 European countries, also good news about covaxin


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ज्यांना भारतात कोव्हिशील्ट लस घेतली आहे आणि आगामी काळात त्यांना युरोपियन देशात जायचे असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर युरोपच्या 9 देशांनी सीरमच्या कोव्हिशील्ड लसीला मंजुरी दिली आहे. आता कोव्हिशील्ड लस घेणारेही युरोपच्या या देशांमध्ये जाऊ शकतील.

यात ऑस्ट्रिया, जर्मनी, ग्रीस, स्वित्झर्लंडचादेखील समावेश आहे. एस्टोनियाने असेही म्हटले आहे की, कोव्हिशील्डसह भारत सरकारने मान्य केलेल्या लसी घेणारेही त्यांच्या देशात येऊ शकतात.

या युरोपियन देशांनी दिली मान्यता

 1. ऑस्ट्रिया
 2. जर्मनी
 3. स्लोव्हेनिया
 4. ग्रीस
 5. आईसलँड
 6. आयर्लंड
 7. स्पेन
 8. एस्टोनिया (भारत सरकारने मंजूर केलेल्या सर्व लसींना मान्यता)
 9. स्वित्झर्लंड (युरोपीयन संघापासून वेगळा देश)

ग्रीन पासचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर भारत सरकारने युरोपियन देशांशी याबाबत चर्चा केली होती. भारत सरकारने युरोपियन युनियन सदस्य देशांना कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन यांना आपापल्या देशांमध्ये मान्यता देण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते, जेणेकरून भारतीयांना युरोपमध्ये प्रवास शक्य होईल.

युरोपियन युनियनकडून कोव्हिशील्डला नव्हती मान्यता

गुरुवारपासून म्हणजेच आजपासून युरोपियन युनियनच्या देशांमध्ये ग्रीन पास सिस्टिम सुरू होत आहे. यात युरोपियन मेडिसीन एजन्सीने (ईएमए) लसीकरण केलेले प्रवासी सहजपणे एका देशातून दुसर्‍या देशात युरोपमध्ये जाऊ शकतात. म्हणजे त्यांना विलगीकरणात राहावे लागणार नाही. परंतु समस्या अशी होती की ईएमएने या यादीमध्ये ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या वॅक्सजेव्हेरियासह केवळ चार लसींचा समावेश केला होता. तर ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनिकाची लस सीरमने कोव्हिशील्ड या नावाने बनविली आहे. या लसीचे नाव यादीत नव्हते.

Covishield vaccine approved by 9 European countries, also good news about covaxin

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण