Core Sector Output : आठ कोअर सेक्टरमध्ये मे महिन्यात 16.8 टक्के वाढ, सरकारकडून आकडेवारी जाहीर

core sector output 8 core industries output grow by 16 8 pc in may due to low base effect

Core Sector Output : आठ कोअर क्षेत्रांतील उत्पादनात मे 2021 मध्ये 16.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गतवर्षी मेमध्ये आठ कोअर सेक्टर्सच्या उत्पादनात 21.4 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. सरकारकडून बुधवारी ही आकडेवारी जारी करण्यात आली. या आठ कोअर क्षेत्रांमध्ये कोळसा, क्रूड ऑइल, नॅच्युरल गॅस, रिफायनरी प्रॉडक्ट्स, फर्टिलायजर्स, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटीचा समावेश आहे. IIPमध्ये आठ कोअर सेक्टर्सची वाटा 40.27 टक्के असतो. core sector output 8 core industries output grow by 16 8 pc in may due to low base effect


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आठ कोअर क्षेत्रांतील उत्पादनात मे 2021 मध्ये 16.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गतवर्षी मेमध्ये आठ कोअर सेक्टर्सच्या उत्पादनात 21.4 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. सरकारकडून बुधवारी ही आकडेवारी जारी करण्यात आली. या आठ कोअर क्षेत्रांमध्ये कोळसा, क्रूड ऑइल, नॅच्युरल गॅस, रिफायनरी प्रॉडक्ट्स, फर्टिलायजर्स, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटीचा समावेश आहे. IIPमध्ये आठ कोअर सेक्टर्सची वाटा 40.27 टक्के असतो.

सरकारी आकडेवारीनुसार, मे 2021 मध्ये कोळसा, नॅच्युरल गॅस, रिफायनरी प्रॉडक्ट्स, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये मे 2020 च्या तुलनेत वाढ पाहायला मिळाली.

या आकडेवारीनुसार मे 2021 मध्ये गतवर्षी याच महिन्याच्या तुलनेत कोळसा उत्पादनात 6.9 टक्के, नॅचुरल गॅस उत्पादनात 20.1 टक्के वाढीची नोंद झाली. अशाच प्रकारे स्टीलच्या उत्पादनातही मे 2020 च्या तुलनेत मे 2021 मध्ये 59.3 टक्के, सीमेंटमध्ये 7.9 टक्के, इलेक्ट्रिसिटीमध्ये 7.3 टक्के वाढ पाहायला मिळाली.

कोअर सेक्टर आउटपुटच्या आकडेवारीनुसार, अगोदरच्या महिन्यात क्रूड ऑइल उत्पादनात 6.3 टक्के, फर्टिलायजर्सच्या उत्पादनात 9.6 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल-मेदरम्यान कोअर सेक्टरमध्ये 35.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. गत आर्थिक वर्षात समान तिमाहीत आठ कोअर सेक्टर्समध्ये 29.4 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. विश्लेषकांच्या मते, लो बेस इफेक्टमुळेआठ कोअर सेक्टर्समध्ये उत्पादनात ही उल्लेखनीय वाढ पाहायला मिळाली आहे.

core sector output 8 core industries output grow by 16 8 pc in may due to low base effect

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात