आता तामिळनाडुची अर्थव्यवस्था सुधारणार रघुराम राजन, सरकारने दिली ही मोठी जबाबदारी

Now Raghuram Rajan will improve the economic health of Tamil Nadu, the government has given a big responsibility

Raghuram Rajan : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख असतील. रघुराम राजन हे 2013 ते 2016 या काळात आरबीआयचे गव्हर्नर होते, आता त्यांना तामिळनाडू सरकारने मोठी जबाबदारी सोपविली आहे. Now Raghuram Rajan will improve the economic health of Tamil Nadu, the government has given a big responsibility


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख असतील. रघुराम राजन हे 2013 ते 2016 या काळात आरबीआयचे गव्हर्नर होते, आता त्यांना तामिळनाडू सरकारने मोठी जबाबदारी सोपविली आहे.

वास्तविक, तामिळनाडू सरकारने राज्याच्या आर्थिक प्रश्नांवर आर्थिक सल्लागार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये रघुराम राजन, एस्तेर दुफलो आणि डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांच्यासह अनेक आर्थिक तज्ज्ञांना स्थान देण्यात आले आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान घोषणा

या आर्थिक तज्ज्ञांना मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीत समाविष्ट करण्याची सरकारची योजना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या तामिळनाडू विधानसभेत 21 जून रोजी झालेल्या भाषणदरम्यान समोर आली आहे.

रघुराम राजन यांच्या व्यतिरिक्त नोबेल पुरस्कार विजेते एस्तेर दुफलो, भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) अरविंद सुब्रमण्यम, माजी केंद्रीय वित्त सचिव एस. नारायणन आणि विकास अर्थशास्त्रज्ञ जीन ड्रीझ. डॉ. सुब्रमण्यम यांनी वैयक्तिक कारणे सांगून नरेंद्र मोदी सरकारच्या सीईए पदाचा राजीनामा दिला होता.

केंद्र सरकारवर प्रश्न

अलीकडेच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशातील ढासळलेल्या परिस्थितीबाबत सरकारवर टीका करताना म्हटले होते की, विविध कारणांमुळे सरकार लोकांच्या मदतीसाठी बर्‍याच ठिकाणी हजर नव्हते.

एवढेच नव्हे, ते असंही म्हणाले होते की, स्वातंत्र्यानंतर कोविड-19 महामारी ही देशातील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यांच्या मते, जेव्हा सर्वप्रथम महामारी आली तेव्हा लॉकडाऊनमुळे हे आव्हान प्रामुख्याने आर्थिक होते, परंतु आता हे आव्हान आर्थिक आणि वैयक्तिक असे दोन्हीही झाले आहे.

Now Raghuram Rajan will improve the economic health of Tamil Nadu, the government has given a big responsibility

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था