गलवानमध्ये चिनी झेंडा नव्हे, तर नववर्षाच्या सायंकाळी भारतीय जवानांनी तिरंगाच डौलाने फडकवला!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी ध्वज झेंडा नव्हे, तर भारतीय तिरंगाच तिरंगा डौलाने फडकला आहे…!! नववर्षाच्या सायंकाळी भारतीय जवानांनी गलवान खोऱ्यात तिरंगा फडकवल्याची छायाचित्रे संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहेत. Not the Chinese flag in Galwan, but the Indian soldiers hoisted the tricolor Doula on New Year’s Eve !!

काही मीडिया रिपोर्ट नुसार गलवान खोऱ्यात चीनचा झेंडा फडकवण्याचा बातम्या होत्या. परंतु त्या खोट्या असून गलवान खोऱ्यात डोगरा रेजिमेंट या जवानांनी तिरंगा फडकवलाची बातम्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. त्याची छायाचित्रेही मंत्रालयाने ट्विट केले आहेत. यामध्ये गलवाल खोऱ्यातील पोस्टवर भारतीय तिरंगा आणि डोगरा रेजिमेंटचा ध्वज फडकताना दिसत आहेत. त्याचबरोबर भारतीय जवानांनी मोठा तिरंगा हातात घेतल्याचे छायाचित्रही यामध्ये आहे.

काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी चिनी झेंडा फडकवण्याचा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या मुद्यावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सरकारला घेरले होते. सोशल मीडिया वरून या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकाही करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी तिरंगा फडकवला आहे, असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी चिनी सैनिकांशी संघर्षात त्यावेळी 20 भारतीय जवान शहीद झाले होते. परंतु त्या संघर्षात भारतीय सैनिकांनी 42 चिनी सैनिकांना मारल्याच्याही बातम्या होत्या. या पार्श्वभूमीवर गलान गलवान खोरे संघर्ष बिंदू बनला असताना तेथे चिनी सैनिकांनी झेंडा फडकवल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात डूगरा रेजिमेंटच्या जवानांनी खोऱ्यामध्ये भारतीय तिरंगा डौलाने फडकला आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Not the Chinese flag in Galwan, but the Indian soldiers hoisted the tricolor Doula on New Year’s Eve !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात