मानव पुन्हा ठेवणार चंद्रावर पाउल, महत्वाकांक्षी मोहिमेसाठी नासाची जय्यत तयारी सुरु


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : ‘अर्टिमिस’ या अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे मानव पुन्हा चंद्रावर उतरणार असून अंतराळवीरांच्या चांद्र प्रवासासाठी आतापर्यंतचे सर्वांत शक्तीशाली ‘स्पेस लाँच सिस्टिम’ (एसएलएस) हे रॉकेट तयार झाले आहे. NASA started Moon mission once again

मानवी चांद्र मोहीम २०२३ मध्ये प्रत्यक्षात येणार असून त्याआधी रॉकेट व अंतराळयानाच्या यशस्वी चाचण्या अभियंते घेणार आहेत. अपोलो-१७ हे यान १९७२ मध्ये चंद्रावर उतरले होते. त्यानंतर आता ‘अर्टिमिस-३’ मोहिमेतून मानव चंद्रावर स्वारी करण्यास पुन्हा सज्ज झाला आहे.
रॉकेटच्या ६५ मीटर उंचीच्या मुख्य भागांचे दोन लहान बूस्टर रॉकेटमध्ये बसविले आहेत. ‘एसएलएस’ या रॉकेटच्या अतिविशाल गाभ्यात चार शक्तिशाली प्रोपेलंट इंजिन आहेत. याच्या दोन्ही बाजूने ५४ मीटर लांबीचे शक्तीशाली रॉकेट बूस्टर आहेत.



या विशाल रॉकेटचे तीन भाग मोबाईल लाँचर पॅडवर स्थापित करण्यात आले. ‘नासा’ यंदा ‘एसएलएस’चे पहिले उड्डाण करणार आहे. या मोहिमेला ‘अर्टिमिस-१’ असे नाव दिले आहे. या मोहिमेत ‘एसएलएस’द्वारे अमेरिकेचे अत्याधुनिक अवकाशयान ओरियन हे चंद्राच्या दिशेने पाठविण्यात येणार आहे. पहिल्या उड्डाणात अंतराळवीरांना पाठविण्यात येणार नाही.

NASA started Moon mission once again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात