नात्यात निर्माण झालेल्या त्रुटी वेळीच दूर करा


नाती प्रत्येकाला हवी असतात. काही नाती जन्माने मिळतात तर काही नाती पुढे निर्माण होतात. मात्र नाती सांभाळताना अनेकदा खूप कसरत करावी लागते. त्यातून ससेहोलपटदेखील होते. त्यामुळे नाती तुटण्याचादेखील धोका असतो. नाती तुटण्याला अनेक कारणे असतात. कधी शोषण, मतभेद, मानापमान, स्वभाव भिन्नता, विचारधारा, अहंकार, विकार, संघर्ष, भांडण, वादविवाद, नातलगाचा मृत्यू आदी कारणांमुळेही ती दुरावतात. Correct relationship errors in a timely manner

शोषणयुक्त नात्यातून बाहेर पडताना व्यक्ती निश्चितच स्वतंत्रतेचा, मोकळेपणाचा नि:श्वास सोडते आणि असे नाते तुटणे योग्यच. परंतु आपण चर्चा करतो आहोत ती अशा दुराव्याची- ज्याचा दाह नात्यातील दोन्ही बाजूंच्यांना किंवा एका बाजूच्या घटकाला तरी सतावत राहतो. नाते तुटण्यापर्यंत पोचण्याआधी प्रत्येकानेच आपल्या नात्याची उजळणी करावी. नियमितपणे नात्याच्या स्वास्थ्याचा आढावा घ्यावा. नात्यात काही त्रुटी आढळल्यास वेळीच त्याची डागडुजी करावी. गाडीला जशी वेळोवेळी देखभालीची गरज भासते तसेच नात्याचेही असते. नात्यात काय उत्तम चालले आहे, काय बदल अपेक्षित आहेत, माझी काय भूमिका अपेक्षित आहे, मी नात्यात शंभर टक्के सहभागी आहे का, आदी प्रश्नांची उत्तरे शोधावीत आणि योग्य ती दुरुस्ती करून नात्याचे हे गाडे पुढे न्यावे.

बऱ्याचदा छोटय़ा छोटय़ा कुरबुरींकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्यातून पुढे मोठे तंटे उद्भवतात आणि मग ते सोडवण्यासाठी कष्ट करावे लागतात. कधी कधी या सगळ्याला उशीर होतो आणि मग नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय, खरे तर नाइलाजाने घेतला जातो. मथितार्थ हा, की आपण सजगपणे प्रयत्नशील राहिल्यास आणि वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलल्यास नाते तुटण्यापासून वाचू शकते.

Correct relationship errors in a timely manner

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात