ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 85 दिवसांची मुदत, आमदार नाही बनल्या तर जाणार मुख्यमंत्रिपद


टीएमसी सातत्याने पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहे, परंतु आयोगाने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. Mamata Banerjee has only 85 days Left to become MLA If Not then could resign from CM Post


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता खुर्ची वाचवणे अवघड वाटायला लागले आहे. याचे कारण उच्च न्यायालयाने 15 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.  नंदीग्राममधील सुवेंदू अधिकारी यांच्या हातून झालेल्या पराभवाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलल्याने ममता दीदींना कसेही करून कोणत्याही जागेवरून का होईना आमदार बनणे गरजेचे झाले आहे.

कायद्यानुसार, ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार होणे आवश्यक आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलल्याने ममता दीदी 5 नोव्हेंबरपर्यंत भवानीपूरमधून निवडणूक जिंकून येऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, टीएमसी सातत्याने पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहे, परंतु आयोगाने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.



टीएमसी निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक घेण्यास सांगत आहे. मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी ममता बॅनर्जी यांना 5 नोव्हेंबरपूर्वी विधानसभेचे सदस्य व्हावे लागेल. कोरोना महामारीमुळे पोटनिवडणूक लांबल्यास ममतांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी भीती तृणमूल काँग्रेसला आहे.

टीएमसीचे शोभनदेव चट्टोपाध्याय ममतांच्या पारंपरिक जागा भवानीपूरमधून निवडणूक जिंकले हे उल्लेखनीय आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही जागा सोडली आहे. ममता बॅनर्जी 2011 पासून दोन वेळा या जागेवरून आमदार झाल्या आहेत. जेव्हा शुभेंदु अधिकारी TMC सोडून भाजपमध्ये सामील झाले, तेव्हा ममतांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. ममता सुमारे दोन हजार मतांनी निवडणूक हरल्या होत्या. अशा स्थितीत प्रशासनाने भाजपच्या दबावाखाली चुकीचे निवडणूक निकाल जाहीर केल्याचा आरोप ममतांनी केला होता.

या निकालाला आव्हान देत ममतांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  गुरुवारी, उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत ढकलली. मुख्यमंत्रिपदावर राहण्यासाठी दीदींना 5 नोव्हेंबरपर्यंत आमदार व्हायचे आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे फक्त 2 महिने 24 दिवस शिल्लक आहेत. येथे निवडणूक आयोगदेखील पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांत ममतांनी आमदार होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आता ममतांना पदावर राहण्यासाठी कोणत्याही एका जागेवरून निवडणूक जिंकावी लागेल, हे निश्चित झाले आहे.

Mamata Banerjee has only 85 days Left to become MLA If Not then could resign from CM Post

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात