अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील बहुतांश निर्बंध उठविले असले तरी सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. हॉटेल्स, मॉल्स मालकांचे अभिनंदन करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.Actor Prashant Damle angry with state government, congratulates hotel-mall owners, says Mogambo Khush huva

राज्य सरकारने ब्रेक द चेन म्हणत संपूर्ण राज्यात निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. पण, नाट्यगृहे बंदच ठेवण्यात आल्यामुळे नाट्य क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर प्रशांत दामले यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.



त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील हॉटेल्स मालकांचे, रेस्टॉरंट मालकांचे, जिम मालकांचे, मॉल्स मालकांचे हार्दिक अभिनंदन. मोगॅम्बो खुश हुवा. म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल,

अशी आशा बाळगू या’आता काळजी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार आहे, असंही प्रशांत दामले म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरं सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता धार्मिक स्थळांसोबतच सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद राहणा असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Actor Prashant Damle angry with state government, congratulates hotel-mall owners, says Mogambo Khush huva

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात