Work From Home : ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुगलने दिला धक्का, पगार कपातीची टांगती तलवार !

Google gives a blow to employees doing work from home, salary likely to be deducted

Work From Home : कोरोना महामारी आणि त्यानंतर लॉकडाऊन झाल्यापासून देशातील बहुतेक लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. आता जर येत्या काळात लोकांनी घरूनच कायमस्वरूपी काम करणे निवडले, तर त्यांचा पगार कापला जाऊ शकतो. जगातील दिग्गज गुगलच्या मते, अशा कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, जे भविष्यात घरून काम करण्याचा पर्याय निवडतील. Google gives a blow to employees doing ‘work from home’, salary likely to be deducted


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि त्यानंतर लॉकडाऊन झाल्यापासून देशातील बहुतेक लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. आता जर येत्या काळात लोकांनी घरूनच कायमस्वरूपी काम करणे निवडले, तर त्यांचा पगार कापला जाऊ शकतो. जगातील दिग्गज गुगलच्या मते, अशा कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, जे भविष्यात घरून काम करण्याचा पर्याय निवडतील.

घरून कायमस्वरूपी काम करणाऱ्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 टक्के कपात करण्याची गुगलची योजना आहे. अमेरिका स्थित सिलिकॉन व्हॅलीमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’च्या पद्धती आणि त्यानुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत विविध प्रयोग केले जात आहेत. सिलिकॉन व्हॅली जगभरातील मोठ्या कंपन्यांसाठी ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखली जाते.

कंपन्या लोकेशननुसार पगार ठरवतात

यापूर्वी फेसबुक, ट्विटर तसेच Reddit आणि Zillow सारख्या कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. या सर्व कंपन्या लोकेशननुसार पगार निश्चित करण्याचे मॉडेल स्वीकारत आहेत. जे महागड्या शहरांतून घरून काम करतात, त्यांचा पगार कमी असतो. जे लहान आणि स्वस्त शहरात राहतात, त्यांचा पगार जास्त कापला जातो. गुगलने जूनमध्ये ‘वर्क लोकेशन टूल’ लाँच केले होते.

गुगलच्या प्रवक्त्याच्या मते, “आमची कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पॅकेज लोकेशननुसार ठरवते. आमचे कर्मचारी कोणत्या शहरातून काम करत आहेत आणि त्यांचे राहणे, खाणे-पिणे किती स्वस्त किंवा महाग आहे या आधारावर आम्ही त्यांना पगार देतो.”

Google gives a blow to employees doing work from home, salary likely to be deducted

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात