चंद्रपूरच्या काँग्रेस खासदारामुळे लोकसभेत पिकला हशा; आधी म्हणाले घटनादुरुस्ती विधेयकाला माझा विरोध, मग म्हणाले- पाठिंबा आहे !

Congress Chandrapur Mp Balu Dhanorkar On 127th Constitutional Amendment Bill in Loksabha

Congress Chandrapur Mp Balu Dhanorkar : लोकसभेत काल 127व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना या चर्चेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनीही आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी घटनादुरुस्ती विधेयकाला समर्थन देण्याऐवजी आपला विरोध असल्याचं म्हटलं. परंतु, लोकसभेतील तालिका अध्यक्षांनी पुन्हा विचारल्यावर मात्र धानोरकर यांनी आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं. यानंतर सभागृहात हास्याची कारंजी उडाली. Congress Chandrapur Mp Balu Dhanorkar On 127th Constitutional Amendment Bill in Loksabha


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेत काल 127व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना या चर्चेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनीही आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी घटनादुरुस्ती विधेयकाला समर्थन देण्याऐवजी आपला विरोध असल्याचं म्हटलं. परंतु, लोकसभेतील तालिका अध्यक्षांनी पुन्हा विचारल्यावर मात्र धानोरकर यांनी आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं. यानंतर सभागृहात हास्याची कारंजी उडाली.

लोकसभेत काय घडलं?

लोकसभेत 127व्या घटनादुरुस्ती विधेयक सरकारकडून मांडण्यात आल्यावर त्यावर चर्चेला सुरुवात झाली. चर्चेच्या सुरुवातीला काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या घटनादुरुस्ती विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचं म्हटलं. यानंतर एकेक करून इतर खासदारांनीही आपली मतं मांडली. मग महाराष्ट्रातील चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीही मत मांडलं.

बाळूभाऊ धानोरकर यांनी इंदिरा सहानी खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयापासून ते महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द करण्यापर्यंत इतिहास वाचून दाखवला. तसंच महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे, हेही त्यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. विविध धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम या केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. आता हे सरकार जाती-जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करत आहे. यामुळे मी या विधेयकाचा विरोध करतो, असं धानोरकर म्हणाले. यानंतर तालिका अध्यक्ष असलेल्या एन. के. रामचंद्रन यांनी धानोरकर यांना पुन्हा प्रश्न केला. तुम्ही विधेयकाला समर्थन देता की त्याच्या विरोधात आहात? असं तालिका अध्यक्षांनी विचारलं. यावर बाळूभाऊ धानोरकर यांनी आपण विधेयकाला पाठिंबा देतो, असं उत्तर दिलं. यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

Congress Chandrapur Mp Balu Dhanorkar On 127th Constitutional Amendment Bill in Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात