वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेस नेतृत्वाला दूरदृष्टी होती. त्यांच्या काळात देशाचा विकास झाला. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र, आज देश उलट्या दिशेने वाटचाल करत आहे.” Two Gujarati are selling countries and Two are buying said Vijay Vadettiwar
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत, असं म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. हे सर्व वडेट्टीवार यवतमाळ येथे बोलत होते.
पुढे वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेस नेतृत्वाला दूरदृष्टी होती. त्यांच्या काळात देशाचा विकास झाला. बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. मात्र आज देश उलट्या दिशेने वाटचाल करत आहे.”
आज संपूर्ण देश केवळ चार गुजराती लोकांच्या हातात गेला आहे, असं म्हणत दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत, असा घणाघाती टोला विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला लगावला.
देशातील मोठं मोठ्या सरकारी विभागाचे खासगीकरण सुरू आहे आणि हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या देशाची सत्ता केवळ काही मोजक्या लोकांच्या हाती दिली जाईल आणि येत्या काळात हे देशासाठी घातक ठरेल, असे भाकीतही त्यांनी याप्रसंगी वर्तवले.
Two Gujarati are selling countries and Two are buying said Vijay Vadettiwar
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App