विशेष प्रतिनिधी
गडचिरोली – सरकारचा दारूबंदी उठविण्याचा आदेश केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरता मर्यादित असून गडचिरोiली जिल्ह्यातील दारूबंदी कायम आहे. शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही कार्यवाही सुरू नाही अथवा प्रस्तावित नाही असे सराकरेन स्पष्ट केले आहे.
दारूबंदी यशस्वी कशी करावी याचे जिल्हाव्यापी प्रारूपच गडचिरोली जिल्ह्यातून उभे राहिले. असे असताना मंत्र्यांनी दारूबंदी विषयी साशंकता निर्माण करणारे निवेदन केल्यामुळे जिल्ह्यात अस्वस्थतता निर्माण झाली होती.
चंद्रपूरपाठोपाठ शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी समिती स्थापनेचा मनोदय मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्हा दारूमुक्ती संघटना व मुक्तीपथ यांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी यशस्वी असून ती कायम ठेवावी अशी अकराशे गावातील लोकांच्या निवेदनांसह पत्र पाठवले होते. या त्राला सरकारतर्फे वल्सा नायर-सिंह यांनी उत्तर देत गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम राहील, अशी ग्वाही दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App