खडसेंची चौकशी करणाऱ्या ईडीने म्हटले -एकनाथ खडसे यांची 2016 मध्ये एमआयडीसीसोबत बैठक झाली, पण त्यांना अजेंडा माहिती नव्हता!

ED probing Khadse corruption case said- Eknath Khadse had a meeting with MIDC in 2016 but he did not know the agenda

Khadse corruption case : अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीकडून महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि पुण्याच्या भोसरी परिसरात तीन एकर जमीन स्वस्त दरात खरेदी केली, असा आरोप आहे. ही जमीन एमआयडीसी अंतर्गत होती. 2016 मध्ये, खडसे यांनी एमआयडीसीसोबत झालेल्या बैठकीचे नेतृत्व केले होते, जिथे त्यांनी एमआयडीसीला पुण्यातील जमीन पत्नी आणि जावयाला विकण्यास सांगितले होते. ED probing Khadse corruption case said- Eknath Khadse had a meeting with MIDC in 2016 but he did not know the agenda


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीकडून महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि पुण्याच्या भोसरी परिसरात तीन एकर जमीन स्वस्त दरात खरेदी केली, असा आरोप आहे. ही जमीन एमआयडीसी अंतर्गत होती. 2016 मध्ये, खडसे यांनी एमआयडीसीसोबत झालेल्या बैठकीचे नेतृत्व केले होते, जिथे त्यांनी एमआयडीसीला पुण्यातील जमीन पत्नी आणि जावयाला विकण्यास सांगितले होते.

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, जेव्हा एकनाथ खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा त्यांनी चौकशीदरम्यान कबूल केले की त्यांची 2016 मध्ये एमआयडीसीमध्ये बैठक झाली होती, परंतु त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी या बैठकीचे नेतृत्व केले नाही. ते फक्त या बैठकीचा भाग होते.

सूत्रांनी सांगितले की, जेव्हा ईडीने त्यांना विचारले की, त्या बैठकीचा अजेंडा काय होता, त्याला खडसे यांनी उत्तर दिले की, मला त्या बैठकीचा अजेंडा माहिती नाही, तेव्हा ही बैठक त्यांच्या ओएसडीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यानंतर ईडीने खडसे यांना ओएसडीचा तपशील विचारला, ज्यात त्यांनी सांगितले की, त्या वेळी त्यांच्याकडे 12 ओएसडी होते आणि कोणत्या ओएसडीने ती बैठक आयोजित केली होती, हे त्यांना आठवत नाही.

खडसे यांनी ईडीला सांगितले की, त्यांच्या ओएसडीने त्यांची बैठक, अजेंडा आखायचे आणि त्यानुसार ते जात असत. त्यानंतर ईडीने त्यांना त्या 12 ओएसडींची यादी मागितली आहे. सूत्रांनी सांगितले की, एकदा त्यांना ती यादी मिळाली की, त्यानंतर ते त्या ओएसडींना चौकशीसाठी बोलावतील, जेणेकरून या प्रकरणात अधिक माहिती मिळू शकेल.

काय आहे प्रकरण?

मे 2016 मध्ये हेमंत गावंडे नावाच्या पुणेस्थित रियल्टर्सने पुणे पोलिसांकडे तक्रार केली, खडसे (तत्कालीन महाराष्ट्राचे महसूल मंत्री) यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आणि एमआयडीसीची जमीन खरेदी केल्याचा आरोप केला. खडसे यांच्या पत्नी आणि जावयाच्या नावे जमीन खरेदी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही जमीन 3.75 कोटी रुपयांना विकत घेण्यात आली, तर जमिनीचे बाजारमूल्य 31 कोटी रुपये होते. महाराष्ट्राच्या भोसरी भागात हा 3 एकरचा भूखंड होता.

अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) खडसे यांना या जमीन घोटाळ्यात क्लीन चिट दिली होती. खडसे वगळता त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी आणि इतर काही जणांना 2018 मध्येच क्लीन चिट मिळाली. पण याच प्रकरणात ईडीने खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप असताना जून 2016 मध्ये त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

ED probing Khadse corruption case said- Eknath Khadse had a meeting with MIDC in 2016 but he did not know the agenda

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात