Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध


  • हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स आणि सर्व दुकानं रात्री दहा पर्यंत सुरू राहणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनासह विविध मुद्द्यांवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात 15 ऑगस्टपासून मोठी शिथिलता देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याबाबत घोषणा केली .Maharashtra Unlock: ‘Freedom’ from lockdown from 15th August; Important announcement of Rajesh Tope

महाराष्ट्रात 15 ऑगस्टपासून निर्बंधातून सशर्त स्वातंत्र्य देण्यात आलं आहे . हॉटेल्स, रेस्तराँ 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्तराँ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सिनेमागृहं आणि नाट्यगृहं पुढील सूचनेपर्यंत बंद राहणार आहेत. आजच कॅबिनेटची बैठक पार पडली या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी माहिती दिली आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यास टास्क फोर्सने विरोध दर्शवला आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात एक बैठक होणार आहे त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

18 वर्षांखालील मुलांचं लसीकरण न झाल्याने टास्क फोर्सने शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान रेल्वे पासबद्दलही राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जो क्यू आर कोड मिळेल त्यानंतर मासिक किंवा त्रैमासिक पास देण्यात येतील.

हॉटेलमध्ये वेटर्सनीही मास्क घालणं बंधनकारक आहे. वेटिंग असेल तर वेटिंगवर असलेल्या लोकांनीही मास्क घालणं आणि कोव्हिडच्या सगळ्या निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे. कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं ही हॉटेल आणि रेस्तराँ सुरू करायची आहेत. कोव्हिड प्रोटोकॉलची जबाबदारी मालकांची असणार आहे. ते त्यांनी पाळले नाहीत तर त्यांच्यावर कारवाईही केली जाईल. ज्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत ते कर्मचारी खासगी कार्यालयांमध्ये हजर राहू शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Maharashtra Unlock: ‘Freedom’ from lockdown from 15th August; Important announcement of Rajesh Tope

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात