सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध


विशेष प्रतिनिधी

काबुल : तरुण मुलींना सेक्स गुलाम बनवण्यासाठी तालिबानी अफगाणिस्तानमधील घरोघरी जाऊन तरुण मुलींचा शोध घेत आहेत. तालिबानी नेते अफगाणिस्तानमधील तरुणींचे अपहरण करुन त्यांच्याशी विवाह करत त्यांना सेक्स गुलाम बनवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे महिलांसाठी अफगणिस्थान आता नर्क बनू लागला आहे.The Taliban are searching for girls and widows in Afghan homes to make them Sex slaves

तालीबानी दहशतवादी असले आणि अत्यंत प्रतिगामी असले तरी आत्तापर्यंत महिलांचा सन्मान करत होते. हिजाबची सक्ती, शिक्षणावर बंदी असली तरी महिलांवर लैंगिक अत्याचार होत नव्हते. मात्र, आता तालीबानींनी इराक आणि सिरीयामधील महिलांना सेक्स गुलाम बनवण्यासाठी कुख्यात असलेल्या इस्लामिक स्टेटचा आदर्श घेतला आहे.आपल्या मुलांचा विवाह करता यावा यासाठी तालिबानी लोकांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या भागातील इमामांना 15 वर्षांवरील युवती आणि 45 वर्षांखालील विधवा महिलांची एक यादी तयार करुन आमच्याकडे सोपवावी असे सांगितले होते. आता तालिबानी जबरदस्तीने घरात घुसून अशा वयोगटातील महिलांचे अपहरण करत आहेत.

तालिबानव्याप्त भागात महिला आणि पुरुषांसाठी अनेक कठोर कायदे तयार करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा दिली जाईल असेही सांगण्यात येत आहे. या भागात शरिया कायदयानुसार निर्बंध लागू झाल्यास येथील महिलांचे स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे.

या पूर्वी उत्तर अफगाणिस्तानमधील एका जिल्ह्यावर ताबा मिळवल्यावर तालिबानींनी स्थानिक इमामांना एक पत्र लिहित फर्मान काढले होते. या पत्रात महिलांना पुरुषसोबत नसल्यास बाजारात जाता येणार नाही, पुरुषांना दाढी वाढवावी लागेल, तसेच सिगारेट किंवा विडी ओढण्यास बंदी असेल असे म्हटले होते. महिलांना हिजाब परिधान करणं अनिवार्य असेल, शाळेत महिला शिक्षिका नसतील तर मुलींना शाळेत जाता येणार नाही. हे नियम मोडल्यास संबंधितास कडक शिक्षा दिली जाईल असा इशाराही देण्यात आला होता.

अमेरिकी आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून परतताच अनेक भागांमध्ये दहशतवादी कारवाया वाढत असल्याचे चित्र आहे. अफगाणिस्तानचे सैन्य आणि तालिबानींमध्ये देशभरात संघर्ष होत असून आठ दिवसांत आठ प्रांतांच्या राजधान्यांवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानींनी केला आहे.

The Taliban are searching for girls and widows in Afghan homes to make them Sex slaves

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी