विशेष प्रतिनिधी
भोपाळ : शेजाऱ्या कडून सतत दिल्या जाणाऱ्या अॅट्रॉसिटी लावण्याच्या धमक्यांना वैतागून ग्वाल्हेर येथील एका ब्राम्हण कुटुंबाने मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.Letter to PM: Brahmin family want to convert to Islam annoyed by neighbors’ threats of atrocity
मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर शहरात शर्मा कुटुंबीय राहतात. त्यांचं एकत्र कुटुंब असून त्यात 25 सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांचे येता-जाता भांडण होते आणि त्या परिवारातील लोक अॅट्रॉसिटी लावू, अशी धमकी सातत्यानं देत असल्याची तक्रार शर्मा यांनी केली आहे.
सततच्या या धमकीला आपण वैतागलो आहोत आणि याची सरकारनं वेळीच दखल घेतली नाही, तर धर्मपरिवर्तन करू, असे त्यांनी म्हटले आहे. मुस्लिम समाज आपलं संरक्षण करेल, असा विश्वास वाटत असून रोजरोजच्या धमक्या आणि त्रासातून आपली सुटका होईल, असं आपलं मत असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.
हे पत्र मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी शर्मा कुटुंबातील प्रमुखांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं आणि त्यांची विचारपूस केली. आणि विनाकारण कुणी धमकी देत असेल, तर त्याचा बंदोबस्त करू असं आश्वासन पोलिसांनी त्यांना दिल्यानंतर शर्मा यांनी वाट पाहण्याची तयारी दाखवली आहे. ही समस्या सुटली नाही, तर मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असून धर्मपरिवर्तन करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App