Cloudburst : ढगफुटी केव्हा आणि का होते, यापासून कसे वाचता येईल? जाणून घ्या- 10 मोठ्या घटना

Know everything About Cloudburst And Why Its Happen in Marathi

Cloudburst : ढगफुटीच्या अनेक घटना पाहायला मिळतात. ही नैसर्गिक आपत्ती विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत दिसून येते. ढगफुटीच्या घटनेमुळे बर्‍याच वेळा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पण लोकांच्या मनात नेहमीच एक कुतूहल असते की खरंच ढग फुटतो का? एखादा ढग फुटला तर काय होईल? ढग कसा फुटतो? तर आज आम्ही या घटनेशी संबंधित आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहोत. Know everything About Cloudburst And Why Its Happen in Marathi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ढगफुटीच्या अनेक घटना पाहायला मिळतात. ही नैसर्गिक आपत्ती विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत दिसून येते. ढगफुटीच्या घटनेमुळे बर्‍याच वेळा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पण लोकांच्या मनात नेहमीच एक कुतूहल असते की खरंच ढग फुटतो का? एखादा ढग फुटला तर काय होईल? ढग कसा फुटतो? तर आज आम्ही या घटनेशी संबंधित आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुख्यत्वे, क्लाउडबर्स्ट हा पावसाचे एक आत्यंतिक रूप आहे. ढगफुटीमुळे एखाद्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा सामना करावा लागतो. ज्या ठिकाणी ढगफुटी होते त्या ठिकाणी फारच कमी वेळेत तीव्र मुसळधार पाऊस पडतो. ज्या ठिकाणी क्लाऊडबर्स्ट होतो तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. क्लाउडबर्स्टची घटना पृथ्वीपासून अंदाजे 15 किमी उंचीवर दिसून येते.

तांत्रिक संज्ञा आहे ‘ढगफुटी’

खरं तर, ‘ढगफुटी’ मुसळधार पावसासाठी एक वापरला जाणारा शब्द आहे. ही एक तांत्रिक संज्ञा आहे. ढग फुग्यासारखे किंवा सिलिंडरसारखे फुटणे असे वैज्ञानिकदृष्ट्या बिलकुल घडत नाही.

उदाहरणार्थ, एखादा पाण्याने भरलेला बलून फुटला, तर एकाच ठिकाणी पाणी खूप वेगात पडते, हीच परिस्थिती ढगफुटीच्या घटनेत दिसून येते. या नैसर्गिक घटनेला ‘क्लाउडबर्स्ट’ किंवा ‘फ्लॅश फ्लड’ असेही म्हणतात.

ही घटना कधी घडते?

जेव्हा मोठ्या प्रमाणात आर्द्रता असलेले ढग एकाच ठिकाणी एकत्रित होतात तेव्हा क्लाउडबर्स्ट उद्भवते. यामुळे तेथे उपस्थित पाण्याचे थेंब एकत्र मिसळतात. थेंबाचे वजन इतके होते की ढगाची घनता वाढते. घनतेमध्ये वाढ झाल्यामुळे अचानक जोरदार पाऊस सुरू होतो.

पर्वतावर ढग का जास्त फुटतात?

वास्तविक, जेव्हा पाण्याने भरलेले ढग वाऱ्यासह फिरतात तेव्हा ते पर्वताच्या दरम्यान अडकतात. पर्वतांची उंची पुढे जाऊ देत नाही. डोंगरांच्या दरम्यान अडकताच ढग पाण्यात रूपांतरित होऊन पाऊस पडू लागतो. ढगांची घनता जास्त असल्याने जोरदार पाऊस सुरू होतो.

जीवितहानी-मालमत्तेचे नुकसान कसे टाळावे?

क्लाउडबर्स्टदरम्यान मोठ्या प्रमाणात जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जीवित-संपत्तीचे नुकसान कमी करण्यासाठी हवामान खात्याकडून अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात एखाद्याने उतारांवर राहू नये. अशा हवामानात एखाद्याने सपाट जमीन असलेल्या भागात राहावे. ज्या डोंगराळ भागात जमीन ढासळते अशा ठिकाणी पावसाचे पाणी शिरण्यापासून रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत.

ढगफुटीच्या 10 घटना

दरवर्षी ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात विनाश होतो आणि यादरम्यान जनजीवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आतापर्यंत क्लाऊडबर्स्टच्या दहा मोठ्या घटनांनी देश हादरला आहे.

पहिली घटना
ऑगस्ट 1998 मध्ये कुमाऊं जिल्ह्यातील काली घाटी येथे ढगफुटीची घटना घडली. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे 250 लोक मरण पावले. यापैकी सुमारे 60 जण कैलास मानसरोवर येथे गेले होते. प्रसिद्ध ओडिया नर्तक प्रोतिमा बेदीही या नैसर्गिक आपत्तीत होत्या. कैलास मानसरोवरच्या तीर्थयात्रेवर ती जात होत्या, पण पूर आणि भूस्खलनामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुसरी घटना
जुलै 2005 मध्ये या नैसर्गिक आपत्तीचा फटका मुंबईकरांना बसला. या घटनेत 50 हून अधिक लोक मरण पावले. यावेळी मायानगरी मुंबईत सुमारे 950 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे शहराची चाके सुमारे दहा-बारा तास ठप्प झाली होती.

तिसरी घटना
जुलै 2005 मध्ये घडली. हिमाचल प्रदेशच्या घनवी येथे ही घटना घडली. या घटनेत ढगफुटीमुळे 10 लोकांचा मृत्यू ओढवला.

चौथी घटना
ऑगस्ट २०१० मध्ये घडलेली ही घटना अतिशय क्लेशकारक होती. जम्मू-काश्मीरच्या लेह येथे झालेल्या ढगफुटीत 1000 हून अधिक लोक ठार झाले आणि 400 हून अधिक लोक जखमी झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे लडाख भागातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आणि 9000 हून अधिक लोक बाधित झाले.

पाचवी घटना
जून 2011 मध्ये जम्मूजवळ डोडा-बाटोटे महामार्गाजवळ ढगफुटीची घटना घडली. या नैसर्गिक आपत्तीत 4 जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाले.

सहावी घटना
जुलै 2011 मध्ये मनाली शहरापासून 18 किमी अंतरावरच्या अप्पर मनाली भागात घडली. येथे ढगफुटीमुळे 2 लोकांचा मृत्यू झाला, तर 22 लोक बेपत्ता झाले.

सातवी घटना
सप्टेंबर 2012 मध्ये उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे ढगफुटीची घटना घडली. या घटनेत 45 लोकांचा मृत्यू झाला, तर 15 लोक जखमी झाले. ढगफुटीच्या या घटनेत 40 जण हरवले होते, त्यापैकी केवळ 22 लोकांचे मृतदेह सापडले, इतरांचा शोध लागलाच नाही.

आठवी घटना
सन 2013 मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये ढगफुटीची घटना घडली. या घटनेत 150 हून अधिक लोक मरण पावले आणि हजारो लोक बेपत्ता झाले. बेपत्ता झालेल्यांपैकी बर्‍याच जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. बेपत्ता झालेले बहुतेक लोक यात्रेकरू होते.

नववी घटना
जुलै 2014 मध्ये घडलेल्या या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. ही नैसर्गिक आपत्ती उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात घडली.

दहावी घटना
सप्टेंबर 2014 मध्ये काश्मीर खोऱ्यात ढगफुटीची घटना घडली. या घटनेमुळे मोठी नासधूस झाली. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे 200 लोक मरण पावले होते.

Know everything About Cloudburst And Why Its Happen in Marathi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण