मंत्रिमंडळ समित्यांमध्ये बदल : राणे, ज्योतिरादित्य आणि अश्वनी वैष्णव यांना या समित्यांमध्ये मिळाले स्थान

changes in cabinet committees rane jyotiraditya and ashwani vaishnav got place in committee

cabinet committees : सरकारने मंत्रिमंडळाच्या शक्तिशाली समित्यांची पुनर्रचना केली असून त्याअंतर्गत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भूपेंद्र यादव आणि सर्बानंद सोनोवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील महत्त्वपूर्ण राजकीय मंत्रिमंडळ समितीचे सदस्य करण्यात आले आहे. changes in cabinet committees rane jyotiraditya and ashwani vaishnav got place in committee


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरकारने मंत्रिमंडळाच्या शक्तिशाली समित्यांची पुनर्रचना केली असून त्याअंतर्गत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भूपेंद्र यादव आणि सर्बानंद सोनोवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील महत्त्वपूर्ण राजकीय मंत्रिमंडळ समितीचे सदस्य करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री कॅबिनेट सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार, किरेन रिजिजू आणि अनुरागसिंग ठाकूर यांचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामांच्या मंत्रिमंडळ समितीत समावेश करण्यात आला आहे.

तथापि, सुरक्षाविषयक देशातील सर्वोच्च निर्णय घेणार्‍या – सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समिती आणि नियुक्तीवरील मंत्रिमंडळ समितीच्या संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. नियुक्तीसंदर्भातील मंत्रिमंडळ समिती सहसचिव आणि त्याहून अधिक पदाच्या सरकारी नियुक्त्यांबाबत निर्णय घेते.

सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीचे सदस्य आहेत पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर. नियुक्तीविषयक मंत्रिमंडळ समितीमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री असतात.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव यांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील गुंतवणूक आणि विकास मंत्रिमंडळ समितीत नवीन सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली रोजगार आणि कौशल्य विकास मंत्रिमंडळाच्या समितीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, रामचंद्र प्रसाद सिंह आणि जी. किशन रेड्डी यांचा नवीन सदस्य म्हणून समावेश आहे.

changes in cabinet committees rane jyotiraditya and ashwani vaishnav got place in committee

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात