8 कोटींच्या रोल्स रॉइसचे मालक बिल्डर संजय गायकवाड, 35 हजारांच्या वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

FIR on Famous Builder Sanjay Gaikwad in electricity Theft by Mahavitaran

Builder Sanjay Gaikwad : देशभरात वीजचोरीची बाब नवीन नाही. पण एखाद्या धनाढ्यावर वीजचोरीचा ठपका लागला तर त्याची चर्चा तर होतेच. महाराष्ट्रातील वीज चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड यांच्यावर नुकताच 35,000 रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना थकीत रकमेसह दंडही भरावा लागणार आहे. FIR on Famous Builder Sanjay Gaikwad in electricity Theft by Mahavitaran


 विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशभरात वीजचोरीची बाब नवीन नाही. पण एखाद्या गर्भश्रीमंतावर वीजचोरीचा ठपका लागला तर त्याची चर्चा तर होतेच. महाराष्ट्रातील वीज चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड यांच्यावर नुकताच 35,000 रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना थकीत रकमेसह दंडही भरावा लागणार आहे.

8 कोटींची कार केली खरेदी

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (महावितरण) गेल्या आठवड्यात एफआयआर दाखल केला होता. वीज चोरीच्या या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर अलीकडेच संजय गायकवाड यांनी आलिशान रोल्स रॉयस कार आठ कोटी रुपयांना विकत घेतली. कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या गायकवाड यांच्यावर 35 हजारांच्या वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रत्येकजण आश्चर्यचकित आहे.

‘एबीपी’ने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक बुंडे यांच्या नेतृत्वात मार्चमध्ये एक टीम तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या पथकाने कल्याण (पू.) येथील कोळसेवाडी परिसरातील गायकवाड यांच्या बांधकाम स्थळांची पाहणी केली व वीज चोरी होत असल्याचे आढळले.

वीज बिलासह दंड भरला

यानंतर महावितरणने तातडीने गायकवाड यांना 34,840 रुपयांचे बिल पाठविले आणि 15,000 रुपये दंडही ठोठावला. दुसरीकडे, गत तीन महिन्यांपासून गायकवाड यांनी पैसे न दिल्याने महावितरणने गत आठवड्यात महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

महावितरणचे म्हणणे आहे की, एफआयआर नोंदल्यानंतर गायकवाड यांनी सोमवारी संपूर्ण बिलाची रक्कम तसेच दंड भरला. दुसरीकडे, संजय गायकवाड यांनी म्हटलं की, “वीजचोरी नसून तडजोडीचं बिल होतं, मीटरचा एक फेज जळाल्यानं महावितरणचे अधिकारी साईट व्हिजिट करण्यास आले होते. मीटरचा एक फेज बायपास असल्याचं त्यांचा निदर्शनास आलं, म्हणून महावितरणकडून तडजोडीचं बिल आकारण्यात आलं. परंतु, बिल आम्हाला मिळालं नव्हतं, माझी नाहक बदनामी केल्याप्रकरणी महावितरणाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.”

FIR on Famous Builder Sanjay Gaikwad in electricity Theft by Mahavitaran

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण