काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे घुमजाव, म्हणाले – ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, माझा आरोप राज्य नव्हे, तर केंद्र सरकारवर!

Congress State President Nana Patole U Turn on His vigilance remark by CM Thackeray

Congress State President Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला. या गंभीर आरोपानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये मोठा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावरून नाना पटोले यांनी आता घुमजाव केला आहे. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत विपर्यास केल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा आरोप राज्य सरकारवर नव्हे, तर केंद्र सरकारविरोधात आहे. मुंबईत आल्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे. Congress State President Nana Patole U Turn on His vigilance remark by CM Thackeray


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला. या गंभीर आरोपानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये मोठा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावरून नाना पटोले यांनी आता घुमजाव केला आहे. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत विपर्यास केल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा आरोप राज्य सरकारवर नव्हे, तर केंद्र सरकारविरोधात आहे. मुंबईत आल्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.

लोणावळा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत. यादरम्यान नाना पटोले यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर खुलासा केला आहे. पटोले म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझे आरोप हे केंद्र सरकारवर होते. राज्य सरकारविरोधात नाही. राज्य सरकारविरोधात माझा कोणताही आरोप नाही. माझ्या वक्यव्याबाबत मुंबईला आल्यावर सविस्तर स्पष्टीकरण देणार आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

काय म्हणाले होते नाना पटोले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजन वक्तव्य केले. ते म्हणाले होते की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवतात. आपण स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, असेही ते म्हणाले होते. नाना पटोले यांच्या विधानामुळे महाविकासआघाडीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Congress State President Nana Patole U Turn on His vigilance remark by CM Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात