पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत बैठक, कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर काय निर्णय घेणार?

BJP Leader Pankaja Munde Called Meeting Of Supporters in Mumbai

BJP Leader Pankaja Munde : केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी सलग तीन दिवस एकापाठोपाठ राजीनामे दिले. यानंतर पंकजा मुंडे यांनी नाराज समर्थकांना आपल्या वरळीतील निवाससाठी बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत त्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. BJP Leader Pankaja Munde Called Meeting Of Supporters in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी सलग तीन दिवस एकापाठोपाठ राजीनामे दिले. यानंतर पंकजा मुंडे यांनी नाराज समर्थकांना आपल्या वरळीतील निवाससाठी बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत त्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांना डावलून भागवत कराड यांना संधी देण्यात आली. यानंतर मुंडे भगिनींचे खच्चीकरण करण्यासाठी कराड यांना मंत्रिमंडळात घेतल्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, मुंडे भगिनींनी एकाही मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या नसल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन नाराजीच्या या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

तथापि, मुंडे समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. यामुळेच पंकजा मुंडे यांनी आज सकाळी वरळी येथील निवासस्थानाजवळील कार्यालयात नाराज समर्थकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

BJP Leader Pankaja Munde Called Meeting Of Supporters in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण